Dipika Kakkar sister in law Saba : सध्या झगमगत्या विश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. नुकताच अभिनेत्री दीपिका कक्करची नणंद आणि अभिनेता शोएब इब्राहिमच्या (dipika kakar & shoaib ibrahim) बहिणीचं मोठ्या थाटात लग्न झालं. दीपिकाच्या नणंदचं सबा असून तिने  खालिद नियाज निकाह केला आहे. सबाच्या मेहेंदी, हळदी आणि लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. ज्यानंतर सबाला तिच्या ड्रेसींग स्टाईलमुळे प्रचंड ट्रोल करण्यात आलं. (dipika sister in law)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नानंतर सबाने असे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामुळे अभिनेत्री अडचणीत आली आहे. सबाच्या अडचणीत यायचं कारण म्हणजे तिच्या मानेवर असलेल्या खुणा. सोशल मीडियावर असे फोटो पोस्ट करणं सबाला इतकं महागात पडलं की तिला यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. (dipika kakar & shoaib ibrahim)



मानेवरील खुणांमुळे सबा चर्चेत


लग्नानंतर सबाने काळ्या ड्रेसमध्ये फोटो शेअर केल्यानंतर तिला ट्रेलिंगचा सामना करावा लागला. सबाच्या मानेवरील खुणा पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना वाटलं ते लव्हबाईट (love bite) आहेत. पण सबाच्या मानेवरील खुणा लव्हबाईट नसल्याचं खुद्द सबाने स्पष्ट केलं आहे. (dipika kakar in saba ibrahim wedding)



मानेवर असलेल्या खुणांवर सबाची प्रतिक्रिया
सबाने इन्स्टग्राम काही फोटो शेअर केले आहेत, ज्यावर सबा म्हणाली, 'मानेवर असलेल्या खुणा नेकलेसमुळे आहेत. एक खूण लग्नातील नेकलेसमुळे तर दुसरी खूण रिसेप्शनमध्ये घातलेल्या नेकलेसमुळे आली आहे...' असं सबाने सांगितलं. 


सबा- खालिद नियाज यांचं लग्न 
शोएब इब्राहिमची बहीण सबाने खालिद नियाजसोबत लग्न केलं. दोघांचा हा प्रेमविवाह आहे. दोघांच्या लग्नाच्या फोटो आणि व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. एवढंच नाही तर, सबा तिच्या रिसेप्शनच्या ड्रेसमुळे ट्रोल झाली होती, तर दुसरीकडे दीपिकाला देखील ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.