नवी दिल्ली : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह काही दिवसांपुर्वीच लग्नबंधनात अडकले आहेत. इटलीत लग्न केल्यानंतर सर्वात आधी बंगळुरूमध्ये त्यांनी रिसेप्शन पार्टी दिली आणि लवकरच मुंबईतही अशीच एक पार्टी होणार आहे. इटलीत लग्न उरकल्यानंतर दीपिका मुंबई आणि बंगळुरूच्या मीडिया कॅमेरांमध्ये दिसली. तिच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद तर दिसलाच यासोबतच आणखी काहीतरी कॅमेरात कैद झालं...ते म्हणजे 'आरके टॅटू'. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


रणबीर कपूरसोबतच्या नात्याची निशाणी 



 रणवीर सिंहसोबत रिलेशनमध्ये येण्याआधी दिपिका रणबीर कपूर सोबत रिलेशनमध्ये होती हे सर्वांनाच माहितेयं. रणबीरशी प्रेमप्रकरण सुरू असताना दीपिकाने त्याच्या नावाचा 'आर के' टॅटू आपल्या मानेवर गोंदवला होता.



त्या दोघांच नातं तुटल्यानंतर दिपिका मोठ्या डिप्रेशनमध्ये गेली पण त्यानंतर रणवीर सिंह सोबत तिच्या नव्या नात्याला सुरूवात झाली. असं असताना तिचा टॅटू काही दूर गेला नाही. 


टॅटू गायब ?



दीपिका आणि रणबीरचं 6 वर्षांचं नातं संपुष्टात आल्याचे खुद्द दीपिकानेचं करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या 'चॅट शो'मध्ये सांगितलं होतं.


लग्ना दरम्यान दीपिकाच्या मानेवर तो टॅटू दिसला नाही. त्यामुळे तिने तो काढल्याचे म्हटले जात होते पण टॅटू पुन्हा एकदा दिसलायं.



कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका लाल ड्रेसमध्ये दिसली तेव्हाही हा टॅटू तिच्या मानेवरून गायब झालेला दिसला.