मुंबई : अभिनेत्री दिप्ती नवल यांना ईमेल द्वारे धमकी देण्यात आली असून त्यांच्याकडून चार लाख रूपयांची मागणी करण्यात आली आहे. खंडणी दिली नाही तर त्यांची इंटरनेट ब्राऊजिंग हिस्ट्री सार्वजनिक करण्याची घमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिप्ती नवल यांना आलेला ईमेल हा मालवेअर असून घाबरून जाण्याचं काही कारण नसल्याचा पोलिसांनी दावा केलाय. असं असलं तरी नेमका हा मेल कुठून आला? याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.


मंगळवारी दिप्ती नवल यांना एक मेल आला ज्यात साडेपाच हजार डॉलर्स बिटकॉईनमध्ये देण्यात सांगण्यात आलं. अन्यथा त्याची इंटरनेट ब्राऊजिंग हिस्ट्री २४ तासाच्या आत सार्वजनिक करण्याची धमकी देण्यात आली. या ई-मेलमध्ये नवल यांच्या मेल खात्याचा युजरनेम आणि पासवर्डदेखील नमूद करण्यात आल्याने नवल यांना चिंता वाटली आणि त्यांनी पोलीसात धाव घेतली.