मुंबई : झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' हा छोट्या पडद्यावरचा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. सोमवारी आणि मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता छोट्या पडद्यावर दाखल होणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी स्ट्रेस बस्टरचे काम करतो. 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही. चला हवा येऊ द्या मध्ये मराठीच नाही तर बॉलिवूडमधील मोठ्या कलाकारांनी देखील हजेरी लावली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'चला हवा येऊ द्या'च्या आगामी भागात महेश मांजरेकर येणार आहेत. महेश मांजरेकर हे लोकप्रिय व्यक्तिमत्व महाराष्ट्राला नवीन नाही. एक ऑलराऊंडर कलाकार म्हणून महेश मांजरेकर यांना ओळखलं जातं आणि ते थुकरट वाडीत येणार म्हंटल्यावर या विनोदवीरांनी एकच कल्ला केला.



चला हवा येऊ द्याच्या कलाकारांनी महेश मांजरेकरांसाठी 'भाईचा बर्थडे' हे विनोदी स्किट सादर केलं ज्यात सिद्धार्थ जाधव, संजय नार्वेकर, संजय दत्त, सलमान खान यांच्या व्यक्तिरेखा या विनोदवीरांनी साकारल्या. जेव्हा थुकरट वाडीत महेशजींच्या म्हणजेच 'भाईच्या बर्थडे' साठी हे सुपरस्टार येतील तेव्हा प्रेक्षकांच्या घरी हास्यस्फोट होणार यात शंकाच नाही.



त्यामुळे पाहायला विसरू नका चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न सोमवार आणि मंगळवार रात्री ९.३० वाजता फक्त झी मराठीवर.