Bad Girl : चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपचा आगामी चित्रपट 'बॅड गर्ल'चा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पडद्यावर प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. रविवारी 26 जानेवारी रोजी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. टीझर पाहिल्यानंतर तमिळ इंडस्ट्रीचे दिग्दर्शक मोहन जी चित्रपट निर्मात्यांवर संतापले. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे आपला संताप व्यक्त केला आहे. वास्तविक, वाद हा चित्रपटाच्या टीझरमध्ये दाखवलेल्या ब्राह्मण मुलीचा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटाची निर्मिती अनुराग कश्यप आणि वेत्रीमारन यांनी केली आहे. 'बॅड गर्ल' हा चित्रपट एका ब्राह्मण मुलीच्या जीवनावर आधारित आहे. जी समाजातील परंपरा आणि स्वतःच्या इच्छांमध्ये संघर्ष करत आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये एक ब्राह्मण मुलगी एका मुलाच्या शोधात आहे, ज्याच्यासोबत तिला तिच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत. मुलाला भेटल्यानंतर, तिचे त्याच्याशी नाते निर्माण होते, ज्यासाठी तिला सतत समाज आणि कुटुंबाकडून टीकेला सामोरे जावे लागते. शेवटी, मुलगी स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी घर सोडते.


मोहन जी यांनी पोस्टद्वारे व्यक्त केला संताप


या चित्रपटाच्या कथेबाबत निर्माते मोहन जी यांनी सोशल मीडियावर चित्रपट निर्मात्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी अनुराग कश्यप याच्यावर निशाणा साधत म्हटले आहे की, एक ब्राह्मण मुलगीचे वैयक्तिक जीवन पडद्यावर दाखवणे हे या शैलीतील चित्रपटासाठी एक आव्हानात्मक आणि नवीन ऑफर आहे. वेत्रीमारन, अनुराग कश्यप आणि कंपनीकडून आणखी काय अपेक्षा करता येईल? ब्राह्मण आई-वडिलांना शिव्या देणे जुने आहे. पण फॅशनेबल नाही. तुम्ही तुमच्या जातीच्या मुलींसोबत अशा कथेत हे करून पहा आणि ते आधी तुमच्या कुटुंबाला दाखवा.



तमिल फिल्म फेस्टिवलमध्ये होणार प्रीमियर


तमिल फिल्म फेस्टिवलमध्ये 'बॅड गर्ल'चा प्रीमियर होणार आहे. या चित्रपटाचा प्रीमियर 30 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2025 दरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव रॉटरडॅमच्या 54 व्या आवृत्तीत प्रदर्शित होईल. या चित्रपटात अंजली शिवरामन, शांतीप्रिया, हृदू हारून, सरन्या रविचंद्रन, तीजे अरुणासलम आणि शशांक बोम्मिरेड्डीपल्ली हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन वर्षा भारत यांनी केले असून, वेत्रीमारन यांनी अनुराग कश्यपसोबत या चित्रपटाची निर्मिती केली आहे.