मुंबई : बॉलिवूडमध्ये 'हाऊसफुल्ल 4' सिनेमा धुमाकूळ घालत असताना मराठी सिनेसृष्टीत दिग्दर्शक प्रसाद ओकच्या सिनेमाने 'हाऊसफुल्ल'चा बोर्ड खेचून आणला आहे. साहसी आईची गोष्ट सांगणारा 'हिरकणी' सिनेमाच्या तिकीटगृहावर हाऊसफुल्लची पाटी झळकली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

24 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकगृहात प्रदर्शित झालेला सिनेमा प्रेक्षकांची मन जिंकत आहे. 'हिरकणी' सोबतच 'सांड की आंख', 'मेड इन चायना' 'हाऊसफुल्ल ४' आणि 'ट्रिपल सीट' प्रदर्शित झाले आहेत. यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांना सिनेमांचा 'फराळ' देखील चाखायला मिळणार आहे. 



'हिरकणी' सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची इतकी गर्दी झाली आहे की, सिनेमागृहाच्या बाहेर 'हाऊसफुल्ल'ची पाटी लागली आहे. मराठी सिनेमाने हिंदी सिनेमांना टक्कर देत प्रेक्षकांच मन जिंकलं आहे. 



'हिरकणी' सिनेमा गुरुवारी प्रदर्शित झाला आणि लगेचच महाराष्ट्रभरात सोमवारी १५० आणि मंगळवारी सुद्धा १५० पेक्षा जास्त शोज हाऊसफु्ल्ल झाले. दिग्दर्शक प्रसाद ओकने याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. 



''होता समोर अंधार सोबतीला नाही कोणी केला एकच निर्धार उतरली 'हिरकणी'...!!!'', अशा अवघ्या चार ओळी लिहीत या सिनेमाचा टीझर लाँच करण्यात आला. सुर्यास्तानंतर गडाची दारं बंद झाल्यानंतर ती थेट सुर्योदयानंतर उघडतात, असे शब्द कानांवर पडतात तेव्हा आठवण होते, ती म्हणजे शालेय जीवनात वाचलेल्या काही संदर्भांची शिवकालीन पराक्रमी वीरांची आणि एका आईची....... हिरकणीची.


गडावर दूध पोहोचवण्यासाठी म्हणून गेलेल्या हिरकणीने घरी असणाऱ्या एकट्या बाळासाठी कशा प्रकारे कडा उतरण्याचा पराक्रम केला होता, यावर या चित्रपटाचून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. कडेकपारिंतून, कोणत्याही मदतीशिवाय मोठ्या धीराने कडा उतरणारी हिकरणी म्हणजे साहस आणि मातृत्वाची सांगड घालणारं एक प्रतिकच. हीच अविश्वसनीय शौर्यगाथा २४ ऑक्टोबरला चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहता आली आहे.