Bigg Boss 16: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे बिग बॉस 16 ची (Television Popular Show Bigg Boss 16). सलमान खानच्या या सुपरहीट शोची सर्वत्र हवा आहे. आता या नव्या सिझनमध्ये कोण कोण सुपरस्टार येणार याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली आहे. आतापर्यंत अनेक नामांकित सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत आणि आता बातमी आहे की चित्रपट निर्माता साजिद खान या शोमध्ये भाग घेणार आहे. (director producer sajid khan could be big boss 16 participant he was caught under me too controversy)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बद्दल अद्याप कुठलीच अधिकृत घोषणा करण्यात आली नसून साजिद खान या शो येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. अशीही माहिती कळते आहे की बिग बॉस या शोसाठी साजिद यांनी होकारही दिला आहे. MeToo च्या आरोपानंतर साजिद पूर्णपणे प्रसिद्धीपासून दूर आहे. 


साजिद खानने अनेक चित्रपट दिग्दर्शित केले आहेत पण MeToo दरम्यान त्यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर तो अचानक प्रसिद्धीच्या झोतात आला. एक नव्हे तर अनेक महिला सेलिब्रिटींनी साजिद खानवर लैंगिक छळ केल्याचे आरोप केले होते. मंदाना करीमी (Mandana Karimi), सलोनी चोप्रा (Saloni Chopra), रेचेल व्हाईट (Rachel White) अशा अनेक महिलांनी त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. 


या प्रकरणानंतर फिल्म असोसिएशनने साजिदवर बंदी घातली होते तसेच अनेक कलाकारांनी त्याच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. अक्षय कुमार आणि रितेश देशमुख सारख्या मोठ्या कलाकरांनीही त्याच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. तेव्हापासून साजिद मीडिया आणि लाईमलाईटपासून दूर होता. साजिद खानची बहीण फरान खानही मोठी कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका आहे. 



सलमान खान बिग बॉस 16 होस्ट करताना दिसणार आहे ज्याचा पहिला प्रोमो देखील व्हायरल झाला आहे. 16 ऑक्टोबरपासून बिग बॉस सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. 


साजिद खानं आत्तापर्यंत अनेक लोकप्रिय चित्रपट दिले आहेत. ज्यात हाऊसफुल्ल (Housefull) सारख्या बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या चित्रपटाचा समावेश आहे.