मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. हृदयविकारावरील उपचारासाठी दाखल केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या त्यांची प्रकृती चांगली आहे. त्यांच्या तपासण्या केल्या जात असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करायची की, याचा निर्णय उद्या सकाळी घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यांना अनेक दिवसांपासून हृदयाचा त्रास होत आहे. 



राजकुमार संतोषी हे सध्या बॅटल ऑफ सारागढी या सिनेमावर काम करत आहेत. या सिनेमात रणदीप हुडा मुख्य भूमिकेत आहे. 


राजकुमार संतोषी यांनी घायल, दामिनी, अंदाज अपना अपना, घातक, पुकार, द लिजंड ऑफ भगत सिंग, फटा पोस्टर निकला हिरो या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.