प्रियांका चोप्रावर आली मुंबईतील संपत्ती विकण्याची वेळ? कारण जाणून बसेल धक्का
प्रियांका चोप्रा ही बॉलिवूडची आघाडाची अभिनेत्री आहे. प्रियांकाने बॉलिवूडसोबतच हॉलिवूड सिनेसृष्टी गाजवली आहे. प्रियांका सोशल मीडियावर कायम सक्रिय असते सोशल मीडियावर प्रियांकाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.
मुंबई : प्रियांका चोप्रा ही बॉलिवूडची आघाडाची अभिनेत्री आहे. प्रियांकाने बॉलिवूडसोबतच हॉलिवूड सिनेसृष्टी गाजवली आहे. प्रियांका सोशल मीडियावर कायम सक्रिय असते सोशल मीडियावर प्रियांकाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. 2018 मध्ये प्रियांकाने निक जोनासशी लग्नगाठ बांधली. प्रियांका आणि निक जोनासला मालती मैरी नावाची गोंडस मुलगी आहे. प्रियांका तिच्या फॅमिलीसोबत कायम फोटो शेअर करत असते. प्रियांका तिच्या कुटूंबासोबत लॉस एंजेलिसमध्ये राहाते. तिथे प्रियांकाचं खूपच अलिशान घर आहे. अनेकदा प्रियांका तिच्या घरातले तिचे आणि तिच्या कुटूंबीयांचेदेखील फोटो शेअर करत असते. मात्र आता प्रियांकाच्या चाहत्यांच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येतेय. जे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
समोर आलेल्या अहवालानुसार प्रियांका सध्या हॉलिवूड सिनेमांवर लक्ष केंद्रित करत आहे. तिथे खूप काम करत असल्याने प्रियांकाने मुंबईतील अंधेरी येथील तिचे दोन अपार्टमेंट दिग्दर्शक आणि लेखक अभिषेक चौबे यांना विकले आहेत. तिने तिची ही प्रॉपर्टी एकूण सहा कोटी रुपयांना विकली आहे. प्रियांका चोप्राचं हे घर लोखंडवाला येथील करण अपार्टमेंट टॉवरच्या 9व्या मजल्यावर आहे, जे एकूण 2,300 स्क्वेअर फूटमध्ये आहे.
नुकतीच या घराची स्टॅम्प ड्यूटी भरली. अभिषेक चौबे यांनी एकूण 36 लाख रुपये स्टॅम्प ड्यूटी भरुन हे घर खरेदी केलं आहे. हा सगळा व्यवहार प्रियांकाची आई मधू चोप्रा यांच्या मदतीने 23 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर रोजी झाला. याआधी प्रियांकाने लोखंडवालामध्ये एक प्रॉपर्टी ७ करोड रुपयांना विकली होती. जी प्रॉपर्टी तिने २०२१ मध्ये भाड्याने दिली होती.नुकतीच प्रियांकाने निकसोबत दिवाळी पार्टीचं आयोजन केलं होतं आणि एका फॅन पेजवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये प्रियंका, प्रीती झिंटा आणि तिचा नवरा जीन गुडइनफसोबत दिसली होती.
प्रियांकाचं वर्कफ्रंट
प्रियांकाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच 'हेड्स ऑफ स्टेट'मध्ये जॉन सीना आणि इद्रिस एल्बासोबत झळकताना दिसणार आहे. तिच्या आगामी सिनेमामध्ये 'सिटाडेल 2' देखील आहे. याशिवाय ती फरहान अख्तरच्या 'जी ले जरा'मध्ये आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबत दिसणार आहे. तिच्या आगामी सिनेमात पाहण्यासाठी चाहते फारच उत्सुक आहेत.