मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटनी पुन्हा चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जखमी झाली आहे. दिशा तिच्या आगामी 'मंगल' चित्रपटाच्या सेटवर जखमी झाली आहे. १४ फेब्रुवारी २०२० मध्ये चित्रपट रूपेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज होणार आहे. चित्रपटात दिशा व्यतीरिक्त अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर आणि कुणाल खेमू देखील भूमिका साकारणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार दिशाची परिस्थिती स्थिर आहे. त्याचप्रमाणे ती लवकरच चित्रीकरणाला सुद्धा सुरूवात करणार आहे. चित्रपटाच्या बहुतेक भागांचे चित्रीकरण मॉरीशस आणि गोवा येथे पार पडले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'भारत' चित्रपटमध्ये दिशाच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळेस देखील दिशा जखमी झाली होती. तिच्या गुडघ्यामध्ये गंभीर दुखापत झाली होती. गेल्या काही दिवसांपासून दिशा चांगलीच चर्चेत आहे. 'मी आभिनेता सलमान खान सोबत चित्रपटात काम करणार नाही'. असे वक्तव्य तिने केले होते. त्यानंतर सलमानने सुद्धा दिशाला चांगलेच उत्तर दिले. सलमानचे वय जास्त असल्यामुळे त्याच्यासह काम करण्यास दिशाने नकार दिला होता.


'एम एस धोनी द अन्टोल्ड स्टोरी' आणि 'बागी २' चित्रपटाने दिशाला चांगलीच प्रसिद्धी  मिळवून दिली. या दोन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर सुद्धा धमाकेदार कामगिरी केली. त्याचप्रमाणे अभिनेता सलमान खान स्टारर 'भारत' चित्रपटाने देखील चांगलेच बॉक्स ऑफिस गाजवले. चित्रपटाने जवळपास २०० कोटींचा गल्ला जमवला. आता दिशाचा 'मंगल' चित्रपट चांहत्यांच्या पसंतीस पडतो की नाही हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.