Tiger Shroff शर्टलेस झाल्यावर स्वतःला रोखू शकली नाही Disha Patani
दिशाच्या कमेंटची सगळीकडेच चर्चा
मुंबई : बॉलिवूडचा ऍक्शन स्टार आणि फिटनेस फ्रिक टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आपले फोटो पोस्ट करत असतो. असाच एक फोटो त्याने मंगळवारी पोस्ट केला आहे. या फोटोची जोरदार चर्चा रंगली. या फोटोमुळे त्याने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. पण यासोबतच त्याने अभिनेत्री आणि रूमर्ड गर्लफ्रेंड दिशा पटानीच (Disha Patani) देखील लक्ष वेधली आहे.
टायगर श्रॉफने शेअर केला फोटो
टायगर श्रॉफने शेअर केलेल्या फोटोने सगळ्यांनाच भुरळ घातली आहे. या फोटोत टायगरने सनग्लासेस घातले आहे. त्याने कॅप्शन दिलं आहे की,'तुम्ही काय बोललात... बीच?' फोटो बघून अगदी स्पष्ट होतंय की तो व्हॅकेशन डेज मिस करत आहे. या फोटोला आतापर्यंत 12 लाखहून अधिक लोकांनी पसंत केलं आहे.
दिशा स्वतःला रोखू शकले नाही
टायगर श्रॉफचा हा फोटो पाहिल्यानंतर दिशा स्वतःला रोखू शकले नाही. तिने त्या फोटोवर कमेंट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. दिशाने टायगरच्या शर्टलेस फोटोवर कमेंट करत फायरची इमोजी पोस्ट केली आहे.
या सिनेमात दिसणार टायगर
टायगर श्रॉफच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो पुढच्या 2 वर्षांसाठी बुक आहे. त्याच्याकडे 'हीरोपंती 2', 'बागी 4', 'रैम्बो' आणि 'गणपत' सारखे सीरिजमधील सिनेमे आहेत. या सिनेमात टायगरचा ऍक्शन लूक दिसणार आहे. आताच्या जनरेशनचा टायगर सर्वात मोठा ऍक्शन स्टार आहे.