मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी फिटनेस फ्रिक आहे. तिचे फिटनेसचे क्रेझ इतके कायम आहे की, नॉर्मल फिटनेसशिवाय ती अॅक्शन आणि स्टंट्सच्या ट्रेनिंगमध्येही खूप व्यस्त असते. बागी २ च्या यशानंतर आता दिशा नवा सिनेमा भारत साठी जबरदस्‍त तयारी करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'एम एस धोनी: द अनटोल्‍ड स्‍टोरी' आणि 'बागी 2 नंतर दिशा आता बॉलिवूडचा सुलतान सलमान खानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. सलमानच्या या सिनेमात सलमान नव्हे तर अभिनेत्रींची जबरदस्‍त अॅक्शन पाहायला मिळणार आहे. अजूनही सिनेमाबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. दिशा सध्या अॅक्शन आणि फिटनेसवर काम करत आहे. याचा एक व्हिडिओ खुद्द दिग्दर्शक अली अब्बाज जफर यांनी शेअर केला. या व्हिडिओत दिशा ट्रेनरसोबत मेहनत घेताना दिसत आहे. तुम्हीही पाहा हा व्हिडिओ...



 


टायगर जिंदा है नंतर दिग्दर्शक अली अब्बाज जफर यांनी सलमानसोबत भारत सिनेमाची घोषणा केली. या सिनेमात सलमान खानसोबत प्रियंका चोप्रा झळकणार आहे. त्याचबरोबर सिनेमात दिशा, तब्बू आणि कॉमेडियन सुनील ग्रोवरही आहे.