मुंबई : फिटनेस फ्रिक अभिनेत्री  दिशा पटनी कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. आता देखील तिने इन्स्टाग्रामवर काही बिकनी फोटो पोस्ट केले आहेत. फोटोमधील तिच्या अदा चाहत्यांना घायाळ करणाऱ्या आहेत. दिशा कायम  तिच्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोंमुळे आणि वर्कआऊट व्हिडिओंमुळे चर्चेत असते.  जिममधील तिने व्हिडिओ अत्यंत प्रेरणादायी असतात. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच दिशा 70 किलोचं वजन उचलताना व्हिडिओ पोस्ट केला. दिशा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. दिशाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच  'राधे' चित्रपटात अभिनेता सलमान खानसोबत दिसणार आहे. शिवाय चित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डाही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'राधे' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दग्शक प्रभू देवा यांच्या खांद्यावर आहे. 



यासोबतच दिशा  'एक विलेन 2'मध्ये दिग्दर्शक मोहित सुरीसोबत दिसणार आहे. याआधी दोघे 2020साली प्रदर्शित झालेल्या 'मलंग' चित्रपटात दिसले होते. याशिवाय दिशा अभिनेता अक्षय ओबेरॉय आणि सनी सिंहसोबत एकता कपूर निर्मित केटीना चित्रपटात दिसणार आहे. यंदाच्या वर्षी दिशाकडे अनेक चित्रपटं आहेत असं म्हणायला हरकत नाही.