अखेर शिक्कामोर्तब!, दिशा पटानी दिसली लाडू वाटताना
दिशा पटानीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
मुंबई : जवळपास 6 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर नातं आणखी घट्ट होत असतानाच अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी यांच्या ब्रेकअपची माहिती समोर आली. ज्याप्रमाणे प्रत्येत नातं तुटण्यामागे काही कारणं असतात अगदी त्याचप्रमाणे बी- टाऊनच्या या सेलिब्रिटी जोडीचं नातं तुटण्यामागेही असंच कारण समोर आलं आहे. त्यानंतर दिशाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. खरंतर, दिशाचा 'एक व्हिलन रिटर्न्स' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला समीक्षकांकडून खूप चांगले रिव्ह्यू आणि रेटिंग मिळाले आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमने हा आनंद साजरा केला.
चित्रपटाला समीक्षकांकडून खूप चांगले रिव्ह्यू मिळाल्यानंतर निर्मात्यांनी या निमित्तानं मीडिया आणि पापाराझींना मिठाईचं वाटप केलं. अशा वेळी सगळ्यांच्या नजरा या दिशावर होत्या. आपल्या बोल्ड स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेली दिशा यावेळी अजून सिझलिंग स्टाईलमध्ये दिसली. एकीकडे दिशा सद्धा तिच्या आणि टायगर श्रॉफच्या वाढदिवसामुळे चर्चेत आहे. तर दुसरीकडे दिशाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दिशाच्या चेहऱ्यावर चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमाचा आनंद दिसतोय. या व्हिडीओत दिशानं काळ्या रंगाचं ब्रालेट परिधान केलं आहे. तर तिचा हा कूल लूक प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे.
या दोघांच्या ब्रेकअपची बातमी येताच प्रत्येकजण त्यामागची कारणे शोधत आहे. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिशा पटानी टायगर श्रॉफसोबत लग्न करण्याच्या प्रयत्नात होती. गेल्या काही दिवसांपासून टायगर आई- वडील आणि बहिण अशा कुटुंबापासून दूर राहत आहे. दिशाही त्याच्यासोबत राहत असल्याचं म्हटलं गेलं. नात्यात काही काळ एकत्र राहिल्यानंतर आपण लग्नबंधनात अडण्याच्या विचारानं तिच्या मनात घर केलं. परंतु टायगर प्रत्येक वेळी या गोष्टीकडे दुर्लक्ष करत राहिला. सूत्रांच्या माहितीनुसार दिशानं टायगरशी लग्नाविषयी बोलण्याचा प्रयत्न केला. पण, त्यानं हा मुद्दा टाळला. 'आता नाही...' अशा शब्दांत उत्तर देत त्यानं दिशाला नकारार्थी प्रतिसाद दिला.
सध्या दिशा या नात्याला लग्नाच्या वळणावर नेण्यास उत्सुक होती, पण टायगर मात्र त्यासाठी तयार नव्हता परिणामी या नात्याला पूर्णविराम लागला. अनेक नाती या एका प्रश्नावर तुटल्याचं तुम्ही ऐकलं आणि पाहिलंही असेल. टायगर आणि दिशाच्या नात्यावरही हीच वेळ आली.
टायगर श्रॉफचे वडील, अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी काही महिन्यांपूर्वीच यंदाच्या वर्षी आपल्या मुलाचे लग्नाचे कोणतेही बेत नसल्याचं स्पष्ट केलं होतं. हे तेच दिवस होते जेव्हा टायगर आणि दिशाच्या लग्नाच्या चर्चांचं वादळ पाहायला मिळालं होतं. 'त्याचं लग्न कामाशी झालंय. सध्या तो कामावर लक्ष केंद्रीत करत आहे. त्यानं जर लग्न करण्याचा कोणताही निर्णय घेतला तर तो त्यावर लक्ष देईल', असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार, दोघांनी पहिलेसुद्धा एकदा ब्रेकअप केला होता, पण पुन्हा एकदा एकत्र आले होते. त्या दोघांच एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे अशात चाहत्यांना असे वाटते की ते दोघं पुन्हा एकत्र येतील.