मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या सौंदर्यासाठी लोक वेडे आहेत, परंतु तिच्या सौंदर्यापेक्षाही आजकाल तिच्या फिटनेस आणि स्टंटची चर्चा आहे. दिशा सोशल मीडियावर आपल्या फिटनेसविषयी चर्चेत राहिली आहे, आता पुन्हा एकदा तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामुळे लोकांना आश्चर्य वाटेल. या व्हिडिओमध्ये दिशा पटानी स्टंट करताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डबल राउंड हॉस किक मारली
दिशा पटानीने तिच्या इंस्टाग्रामवर एक जबरस्त व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती मार्शल आर्टचे कौशल्ये दाखवत आहे आणि लोक तिचे कौतुक करीत आहे. यामध्ये दिशाने उत्कृष्ट डबल राऊंड किक मारून दाखविली आहे.



वंडर वूमन दिशा
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक दिशाचं कौतुक करताना थकत नाही.  कमेंटमध्ये एका फॅनने लिहिले की, 'ही मुलगी आहे की आग ?', तर दुसर्‍याने 'वंडर वूमन' असे लिहिले आहे तर कुणी 'सो कूल' लिहून दिशाचे कौतुक केले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 8 लाखाहून अधिक व्यूज मिळाले आहेत.


दिशाने मानले आभार
व्हिडिओ क्लिप शेअर करताना दिशाने कॅप्शनमध्ये तिच्या ट्रेनरचे आभार मानले आहेत. व्हिडिओ बरोबर तिने लिहिले की, 'महिला दिनाच्या शुभेच्छा. मला मजबूत बनविल्याबद्दल राकेश यादव यांचे आभार.'


या सिनेमामध्ये दिसणार दिशा
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर दिशा पटानी 'राधेः तुम्हारा मोस्ट वॉन्टेड भाई' चित्रपटात 'भारत' या चित्रपटानंतर सलमान खानबरोबर दुसऱ्यांदा दिसणार आहे. हा चित्रपट याच वर्षी 2021 मध्ये ईदच्या निमित्ताने प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभू देवा यांनी केले आहे.