मुंबई : भावाबहिणींच नातं सेलिब्रेट करणार दिवस म्हणजे रक्षाबंधन. हा सण अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. रक्षाबंधनानिमित्त सोशल मीडियावर अनेक कम्पेन्स सुरु आहेत. यातच बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात दिशा आपल्या लहान भावाला सरप्राईज गिफ्ट देते. दिशाचा हा व्हिडिओ जुन्या आठवणींना उजाळा देणारा आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या १० वर्ष लहान भावाला एक खास शैलीत दिशा सरप्राईज देते. त्याच्या लहानपणीचा फोटो घेऊन त्याचप्रमाणे कुर्ती, खुर्ची आणते. तो कुर्ता घालून भावाला त्या खुर्चीवर बसवते आणि त्याच स्टाईलमध्ये फोटो काढते.


तुम्हीही पाहा दिशाचे रक्षाबंधन सरप्राईज...



रक्षाबंधनाचा सण बॉलिवूडचे अनेक सेलिब्रेटीज अगदी उत्साहात साजरा करतात. 


यंदा २६ ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण आहे. रविवार असल्याने सुट्टीचा दिवस आहे. सकाळी ५.५९ ते संध्याकाळी ५.२५ पर्यंत राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आहे.