मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. दिशा आणि बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. त्यादरम्यान, दिशाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नुकतचं दिशानं एक फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिशाही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. आता दिशानं तिच्या फोटोशूटचे काही फोटो हे तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोत दिशा एका डॉलसारखी दिसते. ब्रेकअप झाल्यापासून दिशा थोडी जास्त बोल्ड झाल्याचे काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. 6 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दिशा आणि टायगरने ब्रेकअप केला आहे. 



दुसऱ्या फोटोमध्ये दिशानं गुलाबी रंगाचा ब्रॉलेट आणि लेहेंगा परिधान केला आहे, ज्यामध्ये दिशा एखाद्या अप्सरापेक्षा कमी सुंदर दिसत नाही. दिशाच्या कामाविषयी बोलायचं झालं तर, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'द व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटात दिशा दिसली होती.   हा चित्रपट 29 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र, या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. चित्रपटाचं दिग्दर्शन मोहित सुरीने केलं आहे.