मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा'  (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील दयाबेन म्हणून प्रेक्षकांच्या मनात राज्यं करणाऱ्या दिशा वकानी (Disha Vakani) बद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. दिशा वकानी आता कधी ही 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत दिसणार नाही. परंतू अजून तरी दिशा वकानी (Disha Vakani) किंवा मालिकेकडून (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या बद्दलचं कोणतं ही वक्तव्य देण्यात आलेलं नाही.


दिशा वाकाणी बर्‍याच दिवसांपासून या शोमधून गायब


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिशा वाकानी गेली 3 वर्षे शोमध्ये दिसली नव्हती. दिशा वाकानी 3 वर्षांपूर्वी आई झाली आणि त्यानंतर ती मॅटरनिटी लीववर गेली. त्यानंतर, ती शोमध्ये परतलीच नाही.


कित्येक वेळा तिच्या परत येण्याची चर्चा झाली, परंतु ती अद्याप शोमध्ये दिसली नाही. मालिकेत एका भागामध्ये तिला गोकूळधाममधील लोकांशी बोलताना दाखविण्यात आले. जेथे ती लवकरच अहमदाबादवरुन परत येईल, असे आश्वासन देताना दिसली. पण आजपर्यंत ती काही परत येऊ शकलेली नाही. त्यानंतर तिने  एका मुलाखतीत शोमध्ये परत न येण्याबद्दल वक्तव्य केलं आहे.


काय होणार दयाबेन या व्यक्तिरेखेचं?


जर दयाबेन खरोखरच या कार्यक्रमात परत आली नाही, तर दयाबेनच्या व्यक्तिरेखेचं काय होईल? हा एक मोठा प्रश्न आहे. कारण, निर्मात्यांना दयाबेनच्या भूमिकेत एक परिपूर्ण चेहरा शोधण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील.


दिशा वाकाणीने ज्या प्रकारे हे पात्र साकारले आहे, ते खरोखर कौतुकास्पद आहे. तिचं बोलणं तिचं हसणं हे कोणालाही जमणे शक्य नाही. त्या व्यक्तिरेखेला दुसऱ्या कोणाला ही न्याय देणं तितकं सोपं होणार नाही.


या भूमिकेसाठी  बर्‍याच कलाकारांची नावे समोर येत असतात. परंतू निर्माते यापैकी कोणाची निवड करतील ? का दिशा वाकाणीला परत मालिकेत परत आणण्याचा प्रयत्न करतील? हे आगामी काळातच कळेल.