अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि पतीमध्ये वाद? व्हिडीओ होतोय व्हायरल
सध्या सिनेसृष्टीत लग्नसराई सुरु आहे. गेले अनेक दिवसांत अनेक सेलिब्रिटी मंडळी लग्नगाठ बांधत आहेत. मुग्धा प्रथमेश नंतर स्वानंदी टीकेकरने लग्नगाठ बांधली. तर या पाठोपाठ अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुकर लग्नबंधनात अडकले. या दोघांचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. मात्र या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मुंबई : सध्या सिनेसृष्टीत लग्नसराई सुरु आहे. गेले अनेक दिवसांत अनेक सेलिब्रिटी मंडळी लग्नगाठ बांधत आहेत. मुग्धा प्रथमेश नंतर स्वानंदी टीकेकरने लग्नगाठ बांधली. तर या पाठोपाठ अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुकर लग्नबंधनात अडकले. या दोघांचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या दोघांच्या लग्नाला अनेक बडे सेलिब्रिटी हजर होते. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाले होते. मात्र या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघंही मुंबई-पुण्यावरुन भांडताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हिडीओ सुरु होण्याच्या आधी या व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर उडी उडी जाये. हे गाणं वाजत आहे. यासोबत दोघंही पंतंग उडवताना दिसत आहेत. व्हिडीओच्या सुरुवातीला, स्वानंद तेंडुकर म्हणतो, आता बघ एरिआमधले पतंग कसे गायब होतात ते. यावर गौतमी म्हणते, दुसरं येतं काय रे तुला बाकी सगळ्या गोष्टी मीच चांगल्या करते ना. यावरं स्वानंद म्हणतो, मी जेवण खूप चांगलं बनवतो तुझ्या पेक्षा. यानंतर गौतमी म्हणते, मी खूप चांगली सरप्राईजेस देते. यानंतर स्वानंद म्हणतो, सरप्राईजेस आणि तु? या सगळ्यानंतर समजतं की समोर आलेला हा व्हिडीओ केवळ मनोरंजना करीता आहे. हा व्हिडीओ एक जाहीरात आहे. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची काहीयेक गरज नाही. व्हीडीओच्या शेवटी हे दोघं पुन्हा भांडताना दिसत आहेत. यावेळी दोघंही जोरजारत भांडतात आणि स्वानंद बॅग भरुन घराच्या बाहेर पडतो.
हा व्हिडीओ भाडिपा या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करत व्हीडिओच्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, आमचं ऐका, असं बिलकुल वागू नका! सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चागंलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहताच त्यांच्या चाहत्यांनी यावर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. एकाने कमेंट करत लिहीलं आहे की, चुकीच्या ठिकाणी बोलला भाई, पुण्याची बायको केली ना आता तोंड मिटायला लागणार. तर अजून एकाने कमेंट करत म्हटलंय, पहिल्याच आठवड्यात मोये मोये. तर अजून एकाने म्हटलंय, ये @swanandtendulkar आमच्या घ आत्ता लग्न झालंय रे....जरा.... जरा बरं वागावं ना नशीब तिनी तुडवला नाही तुला...आणि आमच पुणे तुमच्या मुंबई पेक्षा कैक पटिनी छानच आहे. लक्षात असुदे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.