मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. मालिका आणि मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या अतिशय जवळच आहे.  मालिकेतील जेठालाल आणि बबीताचं नाही तर अन्य कलाकार देखील चर्चेत असतात. विशेष म्हणजे या मालिकेतील बबीता (babita TMKOC)म्हणजेच मुनमुन सर्वाना फार आवडली होती. प्रत्येक पत्रावर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. मालिकेतील कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, आजही मालिका प्रेक्षकांच्या मनात अव्वल स्थानी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण नुकतीच मुनमुनच्या बाबतीत एक धक्कादायक घटना घडली आहे. अभिनेत्रीच्या भावाच्या दुकानात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. काही महिलांच्या टोळीनं दुकानात चोरी केल्याची ही धक्कादायक बातमी समोर येत आहे. ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. 


कियानाज वॉर्डरोब असं या कपड्यांच्या दुकानाचं नाव आहे. या दुकानात अनेक प्रकापच्या स्टाईयलिश कपडे मिळतात. मात्र समोर आलेल्या व्हिडिओमध्ये महिलांची टोळी दुकानात चोरी करताना दिसत आहे. काही महिला या दुकानात प्रवेश करतात. मग हळूहळू त्या महिला दुकानातील महागड्या कपड्यांची आणि सामानीच चोरी करतात. ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.  स्वत: अभिनेत्रीने ही सगळी घटना तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.  आणि अशा महिलांच्या टोळीपासून सावध रहा असं आवाहनही केलं आहे.


काही दिवसांआधी  भर दिवसा ही चोरी झाली आहे.   मुनमुननं हा व्हिडीओ शेअर करत लिहिलंय की, "जुहूमध्ये माझ्या राखी बांधलेल्या भावाचं कियानाज बॉर्डरोब नावाचं दुकानं आहे. या दुकानात काही दिवसांआधी चोरीची घटना घडली. चार महिलांच्या टोळीनं चोरी केली आणि ही चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे". या चोरीनंतर जुहू येथील पोलीस स्टेशनमध्ये FRI दाखल करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या महिलांच्या टोळीपासून सतर्क राहण्याचा इशारा पोलिसांनी देखील दिला आहे.



बबिताजी म्हणून मुनमुन दत्ताची प्रतिमा इतकी प्रसिद्ध आहे की, आजही जेव्हा लोक मुनमुन दत्ताला पाहतात तेव्हा नकळत त्यांच्या तोंडून बबिता जी बाहेर पडतं.  मुनमुन दत्ता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या प्रत्येक फोटोवर लोक कमेंट करतात.