घटस्फोटीत व्यक्तीशी सोनाक्षीची लग्नगाठ? घरचे म्हणाले...
घटस्फोटाआधी देखील सोनाक्षीच्या बॉयफ्रेन्डचे प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत अफेअर
मुंबई : झगमगत्या विश्वात कलाकार त्यांच्या चित्रपटांमुळे नाही तर त्यांच्या रिलेशनशिपमुळे अधिक चर्चेत असतात. महत्त्वाचं म्हणजे जेव्हा प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या रिलेशनशिपबद्दल चर्चा रंगतात, तेव्हा चाहत्यांना देखील आपल्या आवडत्या सेलिब्रिटीच्या आयुष्यात तो खास व्यक्ती नक्की आहे तरी कोण? हे जाणून घेण्याची आतूरता असते. आता चर्चा रंगत आहे ती म्हणजे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या रिलेशनशिपबद्दल..
सोनाक्षीच्या बॉयफ्रेन्डचं अभिनेता सलमान खान आणि खान कुटुंबासोबत खास कनेक्शन आहे. सोनाक्षीच्या बॉयफ्रेन्डचं नाव बंटी सजदेह (Bunty Sajdeh) आहे. एवढंच नाही तर सोनाक्षी आणि बंटी लवकरचं लग्न करणार असल्याची चर्चा रंगत आहे. सोनाक्षीच्या लग्नाबद्दल तिच्या कुटुंबाने कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा केलेली नाही. सोनाक्षी सिन्हाबद्दल सर्वांना माहिती आहे पण आज आम्ही तुम्हाला बंटी सजदेह बद्दल सांगणार आहोत.
ज्याचं नाव बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबत खूप दिवसांपासून जोडले जात आहे. बंटी सजदेहचे खान कुटुंबाशी खास नाते आहे. बंटी, सलमान खानचा भाऊ, सोहेल खानची पत्नी सीमा खानचा भाऊ आहे, म्हणजेच तो सोहेल खानचा मेहुणा आहे.
बंटी सजदेह विवाहित असून 2009 मध्ये गोव्यातील अंबिका चौहानसोबत त्याचा विवाह झाला होता. त्यांच्या डेस्टिनेशन वेडिंगमध्ये सलमानने सरप्राईज एन्ट्री केली. पण हे लग्न फार काळ टिकले नाही. चार वर्षांनंतर दोघांचा घटस्फोट झाला.
बंटी सजदेहचे नाव सोनाक्षीपूर्वी सुष्मिता सेन, दिया मिर्झा, नेहा धुपिया आणि समीरा रेड्डी यांसारख्या अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. बंटी आणि सोनाक्षी 2012 पासून एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगत आहे.
बंटी सजदेहची इंडस्ट्रीमध्ये स्पोर्ट्स आणि सेलिब्रिटी मॅनेजर म्हणून ओळख आहे. बंटी सजदेह कॉर्नर स्टोन कंपनीचे सीईओ आहेत. या कंपनीत दिशा सालियनही काम करत होती. एवढंच नाही तर बंटीने विराट कोहलीला अनेक मोठ्या जाहिरातीही दिल्या आहेत.