मुंबई : आज सिने अभिनेत्री दिव्या दत्ता हीचा 41 वा वाढदिवस आहे. दिव्या दत्ता बॉलिवूडमधील अशी अभिनेत्री आहे जिचा सपोर्टिंग ऍक्टर ते लीड रोलपर्यंतचा प्रवास अतिशय सुंदर आहे. दिव्याला 'इरादा' सिनेमाकरता बेस्ट सपोर्टिंग ऍक्टरचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर 'मिल्खा' सिनेमातील अभिनयाकरता तिचं भरपूर कौतुक झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिव्याने 1994 मध्ये आपल्या करिअरची सुरूवात केली. त्यानंतर आजपर्यंत ती बॉलिवूडशी जोडली गेली आणि 'मी ऍण्ड माँ' हे पुस्तकं देखील लिहिलं आहे. 7 वर्षांची असताना दिव्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर तिचं पालन-पोषण आई डॉ.नलिनी दत्ता यांनी केलं आहे. या दोघींचं नातं अतिशय घट्ट आहे. 


पंजाबमध्ये जन्मलेल्या दिव्याने हिंदी आणि पंजाबी सिनेमांमध्ये तसेच टीव्ही, जाहिरात क्षेत्रात काम केलं आहे. दिव्याने फन्ने खां, इरादा, ब्लॅकमेल, बदलापूर, भाग मिल्खा भाग, स्पेशल 26, हिरोईन, दिल्ली 6, उमराव जान सारख्या हिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. 


2005 मध्ये दिव्या आणि तिची आई एम्सटर्डमला आयफा अवॉर्ड पुरस्काराकरता गेली असता एक अजब प्रकार घडला. तिची आई आणि दिव्या शहर फिरता फिरता लोकप्रिय रेड लाइट एरियामध्ये गेल्या आणि तिथे काही फोटोज काढू लागले. पण तेथे फोटो काढायला मनाई असल्यामुळे तिथली एक वेश्या व्यवसाय करणारी बाई मागे लागले. आणि या दोघांना तेथून पळ काढायला लागला.