मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी अतिशय नम्र कलाकार आहे. देशभरात दिव्यांकाचे बरेच चाहते आहेत.  'ये है मोहब्बतें' या मालिकेतून दिव्यांका घराघरांत पोहोचली. या मालिकेतील इशी माँच्या तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. सध्याच्या घडीला ती टॉपची टीव्ही अभिनेत्री आहे. मात्र इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स मिळवणाऱ्या दिव्यांकाचा आताचा फोटो पाहून सारेच हैराण झालेत. दिव्यांकाने गुरुवारी आपल्या इन्स्टाग्रामवर काही असे फोटो शेअर केलेत ज्यात ती एका गोणीमध्ये बंद दिसतेय.


काय आहे या फोटोमागची कहाणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिव्यांकाचा हा हैराण करणारा फोटो रिअल लाईफमधील नव्हे तर रील लाईफमधील आहे. हे चित्र तिच्या ये है मोहब्बतें मालिकेतील आहे. दिव्यांकाने शेअर केलेले तीनही फोटो शूटिंगदरम्यानचे आहेत. भोपाळहून मुंबईत आलेल्या दिव्यांकाने अवघ्या काही वर्षातच टीव्ही इंडस्ट्रीत आपली नवी ओळख निर्माण केली. यामागे तिची मेहनत आहेच मात्र नेहमी हसतमुख असणारी दिव्यांका कॅमेऱ्याच्या मागे कशी असते.




'ये है मोहब्बतें'मधील तिची सहकलाकार अपूर्वा सिंहने दिव्यांकाबाबत म्हटले होते की, ये है मोहब्बतेंमधील शूटिंगचा अनुभव माझ्यासाठी अद्भुत आहे. येथे मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतायत. मला एकता कपूरसोबत काम करण्याची संधी मिळाली. मला विश्वास आहे की प्रत्येक कलाकाराला अशी संधी मिळावी असे वाटत असते.