मुंबई : विश्वामध्ये आज अशा अनेक अभिनेत्रींनी काम केलं, किंवा असे बरेच कलाकार आले ज्यांनी सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. पण, यश सर्वांच्याच वाट्याला भरभरून आलं, असं नाही. कारण, दमदार पदार्पण होऊनही कलाजगतामध्ये सातत्यानं चांगली कामं मिळवण्य़ात एका लोकप्रिय अभिनेत्रीला प्रचंड अपयशाचा सामना करावा लागला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही अभिनेत्री आहे, दिव्यांका त्रिपाठी. हल्लीच दिव्यांकानं तिच्या आयुष्यातील असे प्रसंग सर्वांसमोर आणले ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती. ‘बनूं मैं तेरी दुल्हन’ (Banu Main Teri Dulhan) या मालिकेपासून तिनं अभिनयाची सुरुवात केली. 


हीच मालिका तिच्या वाटेतील अडथळा ठरली. साधीसुधी विद्या प्रताप सिंह साकारल्यानंतर दिव्यांकाला कामं मिळेनाशी झाली. पण, मिळणाऱ्या प्रत्येक नकाराकडे तिनं सकारात्मकतेनं पाहिलं. माझ्या कामाचीच तिथे मागणी नसावी, असंच ती समजू लागली होती. (Divyanka Tripathi) 


पहिल्या मालिकेतच दिव्यांकासा अगदी साधी- सोज्वळ भूमिका मिळाली होती. पण, त्यानंतर तिला भूमिकाच मिळेना. लसी (क्योंकि सास भी कभी बहू थी),  पार्वती (कहानी घर घर की) अशा पात्रांशी तिची तुलना होऊ लागली होती. तुला कोणी पाहणारच नाही, असंच अनेक दिग्दर्शकांचं म्हणणं होतं. 



सततच्या अपयशानंतर अनेकदा भोपाळला परत जाण्याची इच्छाही झाली, पण दिव्यांकानं हा विचार बळावू दिला नाही. पुढे 'ये हैं मोहब्बतें' या मालिकेतून तिनं प्रचंड लोकप्रियता मिळवली आणि 217 मध्ये तिनं अभिनेता विवेक दाहिया याच्याशी लग्नगाठ बांधत एका नव्या प्रवासाची सुरुवात केली.