मुंबई : टीव्ही विश्वातील संस्कारी बहू अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी सध्या तुफान चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत 'दयाबेन' च्या भूमिकेत दिव्यांका प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा रंगली होती. पण दिव्यांकाने ही अफवा असल्याचं सांगितलं आहे. दिव्यांका म्हणाली, 'जेठालाल यांच्या पत्नीची भूमिका साकारण्यासाठी मला ऑफर मिळालेली नाही.' 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईटाइम्सच्या माहितीनुसार दिव्यांकाच्या जवळच्या सूत्राने तिला सांगितलं की, 'दयाबेनच्या भूमिकेसाठी असित मोदी यांच्यासोबत दिव्यांका चर्चा करत आहे. अशा अफवांमुळे प्रेक्षकांची दिशाभूल होते.' त्यामुळे सिद्ध होत आहे की दयाबेनच्या भूमिकेत दिव्यांका त्रिपाठी दिसणार नाही. 


खुद्द दिव्यांकाने यासंबंधी खुलासा केला आहे, 'तारक मेहता का उल्टा चष्मा प्रसिद्ध मालिका आहे. मालिकेचा फॅन फॉलोइंग देखील फार मोठी आहे. मला नाही वाटत मी ही भूमिका साकरण्यासाठी तयार आहेत. मी नव्या संधीच्या शोधात आहे.' असं दिव्यांका म्हणाली.