अनुष्काने डार्लिंग प्रभासला दिले हे बर्थ डे गिफ्ट
बाहुबली २ नंतर अनुष्का आणि प्रभास यांच्या प्रेमाचे किस्से रंगवले जात आहे. त्यात प्रभासचा आज ३७ वाढदिवस असल्याने त्याला अनुष्काने काय गिफ्ट दिले याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
मुंबई : बाहुबली २ नंतर अनुष्का आणि प्रभास यांच्या प्रेमाचे किस्से रंगवले जात आहे. त्यात प्रभासचा आज ३७ वाढदिवस असल्याने त्याला अनुष्काने काय गिफ्ट दिले याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
प्रभासला सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या. पण त्याची सोकॉल्ड 'डार्लिंग' असलेल्या अनुष्काने प्रभासला डिझायनर घड्याळ गिफ्ट दिले आहे. प्रभासला घड्याळ खूप आवडतात. त्यामुळे अनुष्काने त्याची आवड लक्षात घेता त्याला हे गिफ्ट देऊन त्याचा आनंद द्विगुणीत केला आहे.
दरम्यान, चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छांनी भारवलेल्या प्रभासने रिटर्न गिफ्ट म्हणून त्याचा आगामी चित्रपट साहोचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे.
'बाहुबली'तील प्रभासच्या भूमिकेपेक्षा 'साहो' चित्रपटातील लूक फारच वेगळा आहे. प्रभासनेही फेसबुकच्या माध्यमातून हा खास लूक शेअर केला आहे.
'साहो'चा फर्स्ट लूक रिलीज केल्यानंतर काही वेळातळ चाहत्यांनी त्याला झटपट लाईक अअणि शेअर केले आहे. या लूकमध्ये एका मॉर्डन आणि हायटेक शहराला दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाचे शुटिंग हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये करण्यात आले आहे. रामोजी फिल्म सिटीमध्ये याकरिता भव्यदिव्य सेट उभारण्यात आला होता. तसेच १०० हून अधिक घोड्यांचा वापर करण्यात आला आहे. सध्या 'साहो'तील अनेक कलाकार घोडेस्वारीचं प्रशिक्षण घेत आहे.