Ramayan Serial: रामानंद सागर (Ramanad Sagar) यांची रामायण ही मालिका 1980 च्या दशकात अत्यंत लोकप्रिय ठरली होती. अरूण गोविल यांनी साकारलेली रामाची भुमिका ही आजही चाहत्यांच्या मनात आहे. दीपिका चिखिलया (Dipika Chikhaliya) यांनी साकारलेली सीताची भुमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. ही मालिका जेव्हा प्रदर्शित झाली होती तेव्हा प्रेक्षक अक्षरक्ष: आपली दिवसभराची काम आटपून संध्याकाळी खासकरून मालिका पाहण्यासाठी घरी पोहचायचे तेव्हा अक्षरक्ष: रस्ते हे ओस पडायचे. 32 वर्षांनंतर या मालिकेचे पुन:प्रक्षेपण केले होते. ज्यावेळी ही मालिका 20 कोटींच्याही वर लोकांनी पाहिली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

30 वर्षांपुर्वी प्रदर्शित झालेली रामायण ही मालिका आजही प्रेक्षक आवडीनं पाहतात. या मालिकेतील सगळी पात्र आजही लोकप्रिय आहेत. तुम्हाला या मालिकेतील छोटे लव आणि कुश माहितीये का? आज ते दोघं काय करतायत हे तुम्हाला माहितीये का? त्यानंतर रामायणावर आधारित अनेक मालिका आल्या त्यातही लव कुश (Luv Kush Ramayan) यांची जोडी ही प्रचंड गाजली होती. परंतु जुन्या रामायणातील ते छोटे लव कुश आता मोठे झाले असून आपल्या करिअरमध्येही चांगली कामगिरी करत आहेत. (do you remember luv kush in old ramayan serial what are they doing now enterainment news marathi)


काय करतायत आज लव आणि कुश? 


लव कुश या जोडीतील लवची भुमिका ही मराठी अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) आणि कुशची भुमिका मयुरेश क्षेत्रमाडे (Mayuresh Kshetramade) यांनी निभावली होती. अभिनेता स्वप्निल जोशी अनेकदा आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरून आपल्या लहानपणीचा रामायणातला फोटो शेअर करत असतो. त्याच्या या फोटोला खूप लाईक्सही आले आहेत. आज दोघंही आपल्या करिअरमध्ये खूप पुढे गेले आहेत. रामायण या मालिकेसोबत स्वप्निल जोशी यानं कृष्णाचीही भुमिका निभावली होती. जी सुद्धा लोकांच्या पसंतीस उतरली होती. आज स्वप्निल जोशी हा मराठी टेलिव्हिजन, नाटक आणि सिनेमामधील सुपरस्टार अभिनेता आहे. फक्त मराठीच नाही तर हिंदी मालिका आणि चित्रपटांतूनही त्यानं सर्वोत्तम भुमिका निभावल्या आहेत. 


तर कुशची भुमिका निभावणारा मयूरेश यानं आता मनोरंजन हे फील्ड सोडलं असून त्यानं एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरी पत्करली आहे. तो या कंपनीमध्ये सीईओच्या पदावर आहे. आज तो परदेशात स्थायिक झाला आहे. आजही तो आपली कलेची आवड जोपासतो. त्याला पुस्तकं वाचायचा आणि लिहिण्याचा छंद आहे. 


रामायणमधील संपुर्ण टीमची कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी 


काही महिन्यांपुर्वी रामायणातील राम सीता आणि लक्ष्मण यांची भुमिका साकारणाऱ्या अरूण गोविल, दिपिका चिखलिया आणि सुनील लहरी यांनी कपिल शर्माच्या द कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी या मालिकेविषयीच्या अनेक आठवणी शेअर केल्या होत्या.