मुंबई : झी युवावरची डॉक्टर डॉन ही मालिका काही काळातच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. देवदत्त नागे आणि श्वेता शिंदे यांची जोडी पहिल्यांदाच या निमित्ताने आपल्याला एकत्र पहायला मिळतेय. सध्या मोगराच्या रुपाने देवा आणि मोनिका यांच्यातल्या प्रेमपुर्ण संबंधामध्ये एक नवं वळण आलेलं प्रेक्षक पाहत आहेत. आता यात आणखी एका ट्विस्टची भर पडतेय आणि यावेळी याचं निमित्त ठरणारे देवाची मुलगी राधा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राधा देवाची एकुलती एक मुलगी आहे देवाचा तिच्यावर जीव आहे पण राधाला जेव्हापासून देवाच्या कामाबद्दल कळलंय ती त्याच्यापासून कायमची दूर जाऊ लागलीये जे देवासाठी असह्य आहे. म्हणूनच राधाच्या सतत जवळ रहाता यावं यासाठी देवाने तिचं कॉलेज जॉईन केलं आणि यातच तो मोनिका या कॉलेज डिनच्या प्रेमात पडू लागतो. मोनिकाचे प्रेम जिंकण्यासाठी देवा हवे ते प्रयत्न करतोय. यात तो त्याचा मूळ उद्देश म्हणजे राधाला विसरु लागलाय ज्यामुळे राधा मात्र अधिकच नाराज होते. ती देवा आणि डॉ मोनिकाच्या प्रेमात अडसर बनू पहातेय.


राधाचा वाढदिवस येतो तेव्हा कबीर तिला सरप्राईज देण्यासाठी एक मस्त प्लॅन बनवतो. तो तिला तिच्या आईचं पत्र गिफ्ट म्हणून देतो. राधा जेव्हा ते पत्र वाचते तेव्हा तिला कळतं ते तिच्या आईचं नाही तिच्या वडिलांनी लिहीलेलं पत्र आहे राधा यामुळे अधिकच दुखावते आणि कबीरला तिच्या वडिलांचं सत्य सांगते.



जे ऐकून रागाने बिथरलेला कबीर देवासमोर येतो आणि राधाला दुखं दिल्याबद्दल तिच्या वडिलांना आपण कधीच माफ करणार नाही अशी शपथ घेतो. कबीरच्या या शपथेवर देवाची काय प्रतिक्रीया असणार? आणि राधा व कबीर देवा आणि मोनिका यांचे आयुष्य आता कुठच्या वळणावर येणार? हे पहाणे यामुळे अधिक उत्सुकतेचे असेल.