मुंबई : टीव्हीच्या दुनियेपासून फिल्मी कॉरिडॉरपर्यंतचा अद्भुत प्रवास प्रत्येकाला शक्य नाही. पण मृणाल ठाकूर या प्रवासात तिच्या गतीने पुढे जात आहे. दमदार अभिनयासह तिच्या साधेपणाचं सौंदर्य कोणाचंही मन मोहून टाकण्यास पुरेसं आहे. तिच्या लूकची तुलना चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मधुबाला यांच्याशी केली जात आहे. ही कोणासाठीही अभिमानाची गोष्ट असेल. निकतीच यावर मृणालने प्रतिक्रीया दिली आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मृणालने 'सीता रमण' चित्रपटातूनही दक्षिणेत गाजवलं वर्चस्व.
अलीकडेच मृणालने एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली आहे. तिने साऊथमध्येही डेब्यू केला आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या साऊथ स्टार दुल्कर सलमानच्या 'सीता रमन' या चित्रपटात मृणाल तिच्या विरुद्ध लीड रोलमध्ये दिसली होती. यामध्ये रश्मिका मंदान्ना हिचीही महत्त्वाची भूमिका होती.


लूकसाठी मधुबाला यांच्याशी तुलना
साऊथमध्येही मृणालने आपल्या सौंदर्याने सर्वांना वेड लावले आहे. 'सीता रमन'मधील तिच्या लूकमुळे तिची मधुबालाशी तुलना केली जात आहे. याबाबत ती खूप उत्सुकही आहे. ती स्वतः मधुबालाची खूप मोठी फॅन आहे.



मधुबाला यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्रीशी तुलना होणं ही तिच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. असंही मृणाल म्हणाली. इतकंच नाही तर ही चर्चा इतकी झाली की, एखाद्या चित्रपट निर्मात्याचं लक्ष याकडे गेलं पाहिजे आणि तिला मधुबाला यांच्या बायोपिकमध्ये काम करण्याची संधी मिळावी अशी तिची इच्छा आहे.