लाल साडीतील सुहाना खानचे फोटो व्हायरल, हे तिच्या लग्नाचे संकेत तर नाहीत?
Saharukh Khan ची मुलगी सुहाना खान दिसायला खूप सुंदर आहे आणि आजही ती सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींनाही मागे टाकते.
मुंबई : बॉलिवूडचा बादशाहा शाहरुख खान याला कोण ओळखत नाही. छोट्या-मोठ्या सिरिअलमधून करिअरची सुरूवात करणारा शाहरुख खान आज यशाच्या अशा शिखरावर आहे. जेथे फार कमी लोक पोहोचू शकले आहेत. आजच्या काळात असं क्वचितच कोणी असेल जो शाहरुख खानला ओळखत नसेल. शाहरुख खानने बॉलिवूडमध्ये हिट चित्रपट देऊन भरपूर पैसे कमावले आहेत, ज्यामुळे संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याचे खूप नाव आहे. ऐवढेच काय तर तो टॉपच्या अभिनेत्यांच्या यादीत येतो.
शाहरुख खानने गौरी खानशी लग्न केलं होतं, या दोघांना सुहाना खान, आर्यन खान आणि अब्राहम खान नावाची तीन मुलं आहेत.
शाहरुख खानची मुलगी सुहाना खान दिसायला खूप सुंदर आहे आणि आजही ती सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींनाही मागे टाकते. सुहाना खानचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये लाल रंगाची साडी नेसली आहे आणि ती खूप सुंदर दिसत आहे. त्यामुळे तिच्या सौंदर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे आणि याची एकच चर्चा रंगली आहे.
यासोबतच आता सुहाना खानचं एका व्यक्तीसोबत नाव जोडलं जात आहे आणि असे म्हटले जात आहे की, लवकरच ती चंकी पांडेच्या घरची सून बनू शकते.
सुहाना खान दिसायलाही खूप सुंदर आहे आणि सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींना मागे टाकते. अलीकडेच, सुहाना खानचा साडीतील एक फोटो समोर आला आहे, ज्याला पाहिल्यानंतर प्रत्येकजण तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहे.
आजकाल सुहाना खान सोशल मीडियावर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे कारण तिला चंकी पांडेचा मुलगा अहान पांडे आवडू लागला आहे. परंतु हा चंकी पांडेच्या भावाचा मुलगा आहे. परंतु अभिनेता त्याला आपल्या मुलाप्रमाणेच मानतो.
सुहाना खान बर्याच दिवसांपासून चंकी पांडेच्या मुलासोबत वेळ घालवत आहे आणि दोघेही सर्वत्र एकत्र दिसत आहेत. दोघांचे फोटो देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
त्यामुळे आता या लाल साडीमधील सुहानाचे फोटो पाहून लोकांनी अंदाज बांधायला सुरूवात केली आहे की, ती चंकी पांडेच्या घरी सुन म्हणून जाण्याच्या तयारीत तर नाही ना. परंतु तसे काही नाही हे सुहानाचं एक फोटो शुट आहे.