डॉ. अमोल कोल्हे यांना `मराठी विश्वभूषण पुरस्कार` जाहीर
अभिमानास्पद गोष्ट
मुंबई : महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभे करणारे अभिनेता डॉ अमोल कोल्हे यांनी प्रत्येक माणसाच्या घरात मन केलं आहे. झी मराठी वाहिनीच्या माध्यमातून 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतून शंभू राजे प्रत्येकापर्यंत पोहोचवले.
डॉ अमोल कोल्हे यांनी शंभू राजे यांची कारकिर्द आणि त्याकाळचा इतिहास अगदी जशाच्या तसा डोळ्यासमोर उभा केला आहे. एक महत्वाची मालिका म्हणून या मालिकेकडे सगळे प्रेक्षक पाहत आहेत.
या मालिकेत शंभू राजांची भूमिका साकारणारे अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी अपार कष्ट घेतले आहे. 'स्पार्टन'सारख्या लढाईवर एवढा भलामोठा सिनेमा होऊ शकतो. मग आपल्या राजाच्या एवढ्या दैदिप्यमान कार्याची माहिती लोकांना झालीच पाहिजे. हा महत्वाचा उद्देश असणाऱ्या डॉ अमोल कोल्हे यांना 2019 चा 'मराठी विश्वभूषण पुरस्कार' जाहीर झाला आहे.
डॉ. अमोल कोल्हे यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे प्रेक्षकांमध्ये वेगळाच उत्साह आहे. सगळ्याच स्तरावरून त्यांच कौतुक होत असून छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देखील याबाबत डॉ कोल्हेंची भेट घेऊन कौतुक केलं आहे.
कोल्हेंची दुसरी पिढी अभिनयात
संभाजी राजांचा जीवनप्रवास झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आला आहे. या मालिकेतून डॉ अमोल कोल्हे घराघरात पोहोचले आहेत. आता याच मालिकेतून डॉ कोल्हे यांच्या मुलीने देखील छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे.
विशेष म्हणजे आद्या कोल्हे वडिलांसोबत स्क्रिन शेअर करत आहे. कोल्हे यांची दुसरी पिढी देखील या क्षेत्रात पदार्पण केलं आहे. आद्याने मालिकेत सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या ताराची भूमिका साकारत आहे. सेटवरील शूटिंगचे काही फोटो शेअर करत आद्याच्या मालिकेतील पदार्पणाची माहिती दिली.
आद्याची ही पहिलीच मालिका असून तिनं या भूमिकेसाठी विशेष मेहनतही घेतली आहे. त्यामुळे आद्यापेक्षा जास्त तिचे बाबा म्हणजेच अमोल कोल्हे अधिक उत्सुक आहे.