Drink And Drive Case Actor Imprisonment: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते दलीप ताहिल यांना मोठा धक्का देणारा निर्णय कोर्टाने दिला आहे. दलीप ताहिल यांना मद्यपान करुन चारचाकी चालवल्याप्रकरणी म्हणजेच ड्रिंक अॅण्ड ड्राइव्ह प्रकरणी 2 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे प्रकरण 2018 सालातील आहे.


आता अभिनेत्याकडे 2 पर्याय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इन्स्टाग्रामवरील 'व्हिरल भयानी' या मनोरंजन विषयक वृत्तांकन करणाऱ्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. जिल्हा कोर्टाने दलीप यांना ड्रिंक अॅण्ड ड्राइव्ह प्रकरणामध्ये दोषी ठरवलं आहे. कोर्टाने या प्रकरणामध्ये दलीप यांना 2 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. दलीप हे सध्या 65 वर्षांचे असून आता त्यांच्याकडे ही शिक्षा भोगणे किंवा या निर्णयाविरोधात वरिष्ठ कोर्टामध्ये अर्ज करणे असे 2 पर्याय आहेत. 


लाल डोळे, तोंडाला दुर्गंधी अन्...


90 च्या दशकामध्ये अनेक चित्रपटांमधील खलनायकाच्या भूमिकेमुळे घरोघरात ओळखीचा चेहरा झालेल्या दलीप ताहिल यांनी 2018 मध्ये केलेल्या गुन्ह्यासाठी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. दलीप ताहिल यांनी मद्यपान करुन गाडी चालवताना एका रिक्षाला जोरदार धडक दिली होती. यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली होती. हा अपघात मुंबईतील खार येथे घडला होता. या प्रकरणामध्ये पोलिसांनी तपास करुन सर्व पुरावे कोर्टासमोर सादर केला. वैद्यकीय अहवालामध्ये दलीप ताहिल यांनी मद्यपान केलं होतं असं स्पष्ट झालं. दलीप ताहिल हे अपघात झाला तेव्हा कार चालवण्याच्या अवस्थेत नव्हते. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीच्या अहवालामध्ये दलीप ताहिल यांच्या तोंडातून मद्यप्राशन केल्याने दुर्गंधी येत होती, त्यांचे डोळे लाल झाले होते, ते बोलतानाही अडखळत होते. अशा अवस्थेतच ते कार चालवत होते असं नमूद केलं आहे. 



नकारात्मक भूमिकांमुळे गाजले


'बाझीगर', 'रेस', 'हम है राही प्यार के', 'कयामत से कयामत तक' यासारख्या चित्रपटांमध्ये दलीप ताहिल यांनी साकारलेली नकारात्कम भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. दलीप यांनी 'फॅमेली मॅन'मध्ये साकारलेली बॉसची भूमिकाही चांगलीच गाजली.