बिग बींच्या एका चुकीमुळे Ranbir-Alia चं करिअर धोक्यात? जाणून घ्या प्रकरण
सोशल मीडियावर #BoycottBrahmastra हे हॅशटॅग ट्रेंड होत आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि अभिनेत्री करीना कपूरचा (Kreena Kapoor Khan) 'लाल सिंग चड्ढा' (Lal Singh Chaddha) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयी सगळ्यांनाच ठावूक आहे. आता लवकरच रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टचा (Alia BHatt) 'ब्रह्मास्त्र'वर (Brahmastra) चित्रपट प्रेत्रकांच्या भेटीला येणार आहे. रणबीरचा या आधी प्रदर्शित झालेला शमशेरा हा चित्रपट फ्लॉप ठरला. खरंतर शमशेरा या चित्रपटातून रणबीरनं बऱ्याच वर्षांनंतर काम केलं. पण आता याच चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. सोशल मीडियावर लोकांनी 'ब्रह्मास्त्र'ला विरोध करण्यास सुरू केली आहे. या शिवाय #BoycottBrahmastra हे हॅशटॅग ट्रेंड होत आहे. दरम्यान, याच कारण बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) असल्याचे म्हटले जात आहे. या सगळ्याचा परिणाम हा चित्रपटाच्या स्क्रिनिंगवर किंवा मग बॉक्स ऑफिसवर परिणाम होईल आणि त्यामुळे रणबीरचं करिअर धोक्यात येईल, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना सतावत आहे.
आणखी वाचा : Sex ची डिमांड अन्..., उर्फी जावेदकडून पुराव्यानिशी अभिनेत्याचा पर्दाफाश
निर्माता करण जोहरचा (Karan Johar) 'ब्रह्मास्त्र' या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट म्हणून ओळखला जात आहे. हा चित्रपटात रणबीर आणि आलिया पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. मात्र, आता सोशल मीडियावर या चित्रपटावर बहिष्कार #BoycottBrahmastra टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सोशल मीडिया नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कारणांसाठी हा चित्रपट पाहणार नाही असे सांगत आहेत.
आणखी वाचा : प्यार दिवाना होता है... अनिल कपूर यांच्या धाकट्या लेकीचा पतीसोबतचा Intimate Photo Viral
आणखी वाचा : आजोबांना काही विचारलं तर ते उत्तर देतील का? मुलांचा प्रश्न ऐकताच जिनिलिया, म्हणाली...
चित्रपटाचा विरोध करत एक नेटकरी पोस्ट शेअर करत म्हणाला, 'पीके (PK) चित्रपटात रणबीर कपूरनेही हिंदू देव-देवतांचा अपमान केला आणि अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपतीमध्ये पधर घेण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला पण हिजाब आणि बुरख्यावर नाही. या लोकांच्या चित्रपटावर बहिष्कार टाका.
आणखी वाचा : 90 सेकंदात रिक्षा चालकाला 17 वेळा महिलेने लगावली कानशिलात, धक्कादायक व्हिडीओ Viral
आणखी वाचा : सलमान खानला Aids ची बाधा आणि परदेशात मुलगी? अभिनेत्याबाबत मोठं रहस्य समोर
सोशल मीडियावर लोक अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि करण जोहर यांच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे कारण सांगत आहेत. अलीकडेच बिग बींच्या 'केबीसी' (KBC) शोमध्ये एक महिला स्पर्धक बसली होती आणि त्या महिलेनं पधर घेतला होताा. त्यावर अमिताभ यांनी प्रश्न उपस्थित केला पण बुरखा आणि हिजाबबाबत बोलले नाही. त्याच वेळी, त्याच्या 'ये जवानी है दिवानी' चित्रपटाच्या एका दृश्यात, रणबीरनं चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोणशी (Deepika Padukone) मंदिराच्या मागे मेकआऊट बोललो. प्रेक्षकांना ही गोष्ट आवडली नाही. आता सोशल मीडियावर 'ब्रह्मास्त्र'वर बहिष्कार टाकण्याच्या मागणीचा चित्रपटाच्या कमाईवर काय परिणाम होतो, हे लवकरच कळेल. हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.