मुंबई : अभिनेता आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणात गेल्या 18 दिवसांपासून तुरूंगात आहे. बुधवारी झालेल्या सुनावणी दरम्यान देखील न्यायालयाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला. दरम्यान मुलाच्या ड्रग्स प्रकरणामुळे अभिनेता शाहरुख खानच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्या 18 दिवसांपासून जेलमध्ये असलेल्या मुलाल भेटण्यासाठी शाहरुख अखेर पहिल्यांदा आर्थर जेलची पायरी चढला. बदलेल्या एका नियमामुळे शाहरुख मुलाला भेटू शकला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं म्हणजे, कोरोना निर्बंध शिथिल करून, आजपासून म्हणजेच 21 ऑक्टोबरपासून, कैदी/विचाराधीन कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. या बदलानंतर, आजपासून जास्तीत जास्त दोन नातेवाईक किंवा वकील कैद्यांना भेटू शकतील. अशा परिस्थितीत, शाहरुख खान, जो आपल्या मुलाला गेल्या काही दिवसांपासून भेटू शकला नाही, तो सकाळीच मुलाला भेटण्यासाठी तुरुंगात पोहोचला .



तुरूंगाबाहेर नोटीस 
कोविड नियमांच्या बदलाबाबत आर्थर रोड कारागृहाबाहेर नोटीस लावण्यात आली आहे. ज्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की आजपासून कोणीही पूर्व परवानगी आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन करून तुरुंगात कैद्याला भेटू शकतात. नियम शिथिल केल्यामुळे आर्यनला वडिलांना भेटता आलं. ही भेट 10 मिनिटांसाठी होती.