मुंबई : झी मराठी वरील "लगीर झालं जी "या लोकप्रिय मालिकेचे पार्श्वगीत, "ये रे ये रे पावसा" चित्रपटाचे टायटल साँग, लव्ह लफडे चित्रपटातील 'ताईच्या लग्नाला' यासारखी एकापेक्षा एक सुपरहिट गाणी देणारे गायक आणि संगीतकार प्रवीण कुवर यांचे नवे चित्रपट गीत लवकरच चाहत्यांच्या भेटीला येतयं. या चित्रपटाचे नाव मात्र अद्याप गुलदस्त्यात असलं तरी गाण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. दुर्वा एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि निलेश पाटील ( शेलिनो ड्रीम्स इन्फोटेन्मेंट ) निर्मित "फुगडी" या गायक प्रवीण कुवर यांच्या आवाजातील गाण्याचे रेकॉर्डींग नुकतेच अंधेरीच्या युफोनी स्टुडिओत पार पडलं. निलेश पाटील यांची ही पहिलीच निर्मिती असून लवकरच या गाण्याच्या चित्रीकरणालाही सुरुवात होणार आहे.


"फुगडी..."विषयी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


"फुगडी..." या गाण्याची रचना ही नवोदित गीतकार रमझान पठाण यांची असून दिग्दर्शन सुकेश सावर्डेकर यांनी केलंय. या गाण्यावर अभिनेता चेतन कुमावत थिरकणार असून चेतनने याआधी बरीच व्यावसायिक नाटकं, लोकमान्य एक युगपुरुष हा चित्रपट, तसेच कलर्स मराठी वरील कुंकू टिकली टॅटू या मालिकेत काम केलंय. या मालिकेतील त्याने साकारलेला खलनायक विशेष गाजल्यानंतर आता या गाण्यात तो काय धम्माल करणार ? हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.