मुंबई : एखाद्या चित्रपटातील भूमिका दिग्दर्शकाला हवी असेल तशी साकारणं आणि त्या भूमिकेशी एकरुप होणं हे प्रत्येक स्टारसमोरचं आवाहन असतं. अनेकदा शूटिंग  करत असताना कलाकारांना दुखापत होते किंवा काही कारणाने त्यांना एखादा सीन शूट करताना समस्या येतात. असाच एक किस्सा अभिनेत्री मौसमी चटर्जी  यांच्यासोबत घडला होता. त्यावेळी मौसमी यांचं नाव बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जात होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक भूमिका ताकदीने निभवण्यात त्या निपुण होत्या. चित्रपटातील प्रत्येक सीनवर मेहनत घेणाऱ्या मौसमी यांनी एक सीन असाही केला होता. ज्यानं त्यांना त्याच्या  खऱ्या आयुष्यात खूप रडवलं. प्रेग्नन्ट असताना मौसमी यांनी एक बलात्काराचा सीन शूट केला होता.


'रोटी, कपड़ा और मकान' या चित्रपटात मौसमी चटर्जी मुख्य भूमिकेत होत्या. याच चित्रपटात त्यांच्यावर एक बलात्काराचा सीन शूट केला जाणार होता. त्याचवेळी  मौसमी प्रेग्नेंट होत्या आणि त्यांची तब्येत वारंवार बिघडत होती. त्यामुळे हा सीन कसा शूट करायचा याची त्यांना काळजी वाटत होती.  अखेर मनाची तयारी नसतानाही  मौसमी या सीनसाठी तयार झाल्या होत्या. पण या सीनचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला.



मौसमी चटर्जी यांचा 'रोटी, कपड़ा और मकान' या चित्रपटातील हा सीन एका पीठाच्या गोदामात शूट केला जाणार होता. सीननुसार खलनायक आणि काही गुंड त्यांना  जबरदस्ती पकडणार होते. यावेळी झालेल्या ओढा-ताणीत मौसमी यांच्यावर जास्त प्रमाणात पीठ पडलं. त्यांच्या तोंडात आणि केसातही सर्व पीठ गेलं. शूट करताना  त्यांच्यावर बरंच पीठ सांडलं होतं. स्वतःची अवस्था पाहून मौसमी रडू लागल्या. मौसमी यांच्या म्हणण्यानुसार त्यावेळी त्या प्रेग्नेंट होत्या आणि खाली पडल्यानं त्यांना  रक्तस्त्राव सुरू झाला होता. त्यांना लगेच रुग्णालयात नेण्यात आलं पण सुदैवानं बाळाला कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही.


पहिल्या मुलीच्या जन्माच्या वेळी मौसमी यांचं वय केवळ १८ वर्षं होतं. त्यांच्या काळात त्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या ६ व्या अभिनेत्री होत्या. चित्रपटातील  रडतानाची दृश्यही त्या ग्लिसरीन न वापरता करत असत एवढा त्यांचा अभिनय उत्तम होता.


 याबाबत त्यांनी सांगितलं होतं, 'जेव्हा कोणत्याही सीनमध्ये मला रडायचं  असेल तर मी विचार करत असे की, परिस्थितीत जर खरंच असती तर असा विचार केल्यावर मला खरंच रडू येत असे आणि तो सीन मी पूर्ण करत असे.'