SSR Case : महेश भट्ट यांच्याकडून चौकशीदरम्यान अनेक गोष्टींचा उलगडा
प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांची सांताक्रूझ पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली.
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी या जगाचा निरोप घेतला. वांद्रे येथील राहत्या घरात गळफास लावून त्याने आत्महत्या केली. त्याने नक्की आत्महत्या का केली. याच शोध सध्या पोलीस घेत आहेत. याप्रकरणी आतापर्यंत ३७ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. आज प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांची सांताक्रूझ पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली. तब्बल दोन तासांच्या चौकशीनंतर महेश भट्ट यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला.
महेश भट्ट यांनी चौकशी दरम्यान सांगितले की, '२०१८ ते २०१९ वर्षांमध्ये मी सुशांतला फक्त दोन वेळा भेटलो. तेव्हा मी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला 'जलेबी ' चित्रपटासाठी कास्ट केलं होतं.' रियामुळेच माझी आणि सुशांतची भेट झाली असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
शिवाय सुशांतसोबत कोणत्याही प्रकारचा चित्रपट साकारणार नसल्याचा खुलासा देखील महेश भट्ट यांनी चौकशी दरम्यान केला. 'सुशांतने माझ्यासोबत काम करण्याची इच्छ व्यक्त केली होती. मात्र 'सडक २' चित्रपटासाठी कलाकारांची निवड करण्यात आली होती अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
त्यामुळे सुशांतला मुख्य भूमिका देण्याचा दावा करण्यात आला नव्हता असं याठिकाणी स्पष्ट होताना दिसत आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि महेश भट्ट यांच्यात चांगली मैत्री आहे. शिवाय रिया कोणत्याही गोष्टीसाठी महेश यांच्याकडून सल्ले घेत असल्याचं वक्तव्य रियाने केलं होतं.
एवढचं नाही तर रिया तिच्या रिलेशनशिप संबंधीत सल्ले देखील महेश भट्ट यांच्याकडून घेत असल्याचं ट्विट महेश भट्ट यांची असिस्टंट सुहरिता दासने केलं होतं. सुशांत आणि रिया रिलेशनशीपमध्ये होते. सुशांतच्या आत्महत्येच्या दोन महिन्यापूर्वी पासून त्यांच्यात मतभेद सुरू असल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या.