मुंबई : पद्मावती चित्रपटातील 'घुमर' गाण्यानंतर दुसर आणि तितकंच जबरदस्त गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 'एक दिल एक जान' असे या गाण्याचे शब्द आहेत. गायक शिवम पाठक याच्या आवाजात हे गाणं रेकॉर्ड करण्यात आले आहे. ए.एम. तुराझ यांनी हे गाणं लिहलेलं असून संजय लीला भंसाळी यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. 
 'घुमर' गाण्यामध्ये राजस्थानमधील लोकनृत्याची झलक दाखवण्यात आली होती. नव्या गाण्यामध्ये पद्मावती आणि राजा रवल रतन सिंग यांच्या नात्याला खुलवण्यात आलं आहे. त्यांच्यामधील हळूवार संबंध या गाण्यामध्ये उत्तम रित्या टिपण्यात आले आहेत. 




 
 पद्मावती हा सिनेमा 1 डिसेंबरला चाह्त्यांच्या भेटीला येणार आहे. 3 डी स्वरूपातही या चित्रपटाला प्रदर्शित केले जाणार आहे. 


  एकीकडे चाह्त्यांचं प्रेम तर दुसरीकडे करणी सेना, राजपूत सेना अशा संघटनांचा रोष वाढत आहे. त्यामुळे चित्रपटाला विरोध होत आहे. त्यांच्याकडून चित्रपटगृहांचे नुकसान करण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्सऑफिवर कशी कमाई करणार ? हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.