मुंबई : 'एक हजारो में मेरी बेहना है' फेम ज्येष्ठ अभिनेत्री तरला जोशी यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. तरला जोशी यांनी मालिकेत बीजीची  भूमिका साकारली होती. मालिकेत अभिनेत्री निया शर्मा आणि क्रिस्टल डिसूझा यांनी तरला यांच्या नातींची भूमिका साकारली होती. मालिकेत दोघींचं त्यांच्या आजीवरील प्रेम आणि मस्ती आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मालिकेने सर्वांच्या मनात घर केलं होतं. जोशी यांच्या निधनानंतर निया शर्माने सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


निया इन्स्टाग्राम स्टोरीवर तरला जोशी यांचे काही फोटो शेअर केले आहे.  मालिकेत निया मुख्य भूमिकेत दिसली होती. मालिकेत नियाने मानवीची भूमिका साकारली होती, तर क्रिस्टलने मानवीच्या मोठ्या बहिणीच्या भूमिकेला योग्य न्याय दिलं. 


तरला जोशी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, 'साराभाई वर्सेज साराभाई' आणि 'बंदिनी' मालिकांच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांच्या भेटीस आल्या होत्या. 'बंदिनी'मध्ये त्यांनी वसुधा बेनच्या भूमिकेत दिसल्या होत्या.  तरला जोशी यांच्या निधनानंतरही त्यांच्या भूमिका चाहत्यांच्या मनात जिवंत राहतील. 


 'एक हजारो में मेरी बेहना है' हे गाणं 1971 साली प्रदर्शित झालेल्या 'हरे राम हरे कृष्णा' चित्रपटातील आहे. चित्रपटात अभिनेते देव आनंद आणि अभिनेत्री झिनत आमान मुख्य भूमिकेत झळकले होते.