मुंबई : प्रसिद्ध मराठी गायक संगीतकार सलिल कुलकर्णी त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून सलिल कुलकर्णी नेहमीच ते काही ना काही शेअर करत असतात. सलिल कुलकर्णी सोशल मीडियावर फोटो व्हिडीओ शेअर करतात. नुकतीच सलिल कुलकर्णी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘एका माकडाने काढले दुकान’ या गाण्यावर शाहरुख खानची लेक थिरकताना दिसत आहे. जी चांगलीच व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलिल कुलकर्णी यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ 'एका माकडाने काढले दुकान' या गाण्याचा भन्नाट एडिटेड व्हिडीओ आहे. या एडिटेड व्हिडीमध्ये सुहाना खान डान्स करताना दिसत आहे. खरतंर तिचा हा डान्स व्हिडिओ तिचा  नुकताच रिलीज झालेला आर्चिज सिनेमातील आहे. ज्यामध्ये ती डान्स करताना दिसत आहे. मात्र गंमतिशीरबाब म्हणजे या व्हिडीओमागे एका माकडाने काढलंय दुकान हे गाणं वाजताना दिसत आहे. हा भन्नाट एडिटेड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 


सलिल कुलकर्णी यांनी हा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की,  "एका माकडाने काढले दुकान..आली गिऱ्हाईके छान छान "विंदांच्या या कवितेचं मी १९९९ मध्ये गाणं केलं होतं...आत्ताची धृपद गायिका मेघना सरदार तेव्हा १०-११ वर्षांची होती,तिने ते गायलं होतं ....लहान मुलांच्या अनेक पिढ्यांनी हे मनापासून ऐकलं.... दाद दिली...नंतर अनेक YouTube channel ने ह्याचे उथळ हिंदी भाषांतर करून माझ्याच चालीत रिलीज केलं....मी अर्थातच " निषेध सुद्धा नोंदवलेला नाही" मग हळूहळू मराठीतल्या पण अनेक YouTube चॅनल ने विंदा किंवा माझा उल्लेख न करता ते वाजवले , त्याचा व्हिडिओ केला. मी पुन्हा एकदा "जगभरातील मुलांनी ऐकलं ...त्यांना आवडलं हे खूप आहे " असा समजूतदार ( खरं तर बावळट आणि आळशी ) धोरण स्वीकारलं...आता काही दिवसांपूर्वी हे गाणं ह्या धमाल editing सकट बघायला मिळालं ..ते सुद्धा viral झालं..आता तर मी निषेध वगैरे ओलांडून..हसण्याच्या स्टेजला आलो आहे....


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


विंदांच्या घरी बसून त्यांना हे गाणं ऐकवलं होतं...त्यांनी हा व्हिडिओ पाहिला असता तर " माझ्या मना बन दगड  नावाची त्यांची कविता ऐकावयाला त्यांना अजून एक कारण सापडले असते... तर.." एका माकडाने काढले दुकान " या गाण्याचा प्रवास गमतीशीर चालू आहे....आजची छोटी मुलं सुद्धा ते गाणं ऐकातायत... विंदा....आपल गाणं HIT आहे....सलील कुलकर्णी यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. कलाकारांसह नेटकऱ्यांनी या पोस्टवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही तासांपूर्वी शेअर केलेल्या या पोस्टला २ हजारहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत.सलिल यांनी शेअर केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.