मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor) अनेकदा चर्चेचा विषय ठरते. यापूर्वी एकता 'ट्रिपल एक्स' (XXX) या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलेल्या आक्षेपार्ह दृश्यांमुळे कायदेशीर अडचणीत सापडलेली होती. आता एकता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. नुकताच एकताचा लेटेस्ट व्हिडिओ समोर आला आहे, या व्हिडिओमध्ये एकता शॉर्ट्स घालून मंदिरात दर्शनासाठी आली होती. यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर एकताला ट्रोल केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकताने छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत तिचं नावं कमावलं आहे. शनिवारी इंस्टेंट बॉलिवूडने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एकता जिम शॉर्ट्स आणि शूज घालून मंदिरात पोहोचली आहे. मात्र, मंदिरात प्रवेश घेऊन एकतानं बूट काढले. पण असे कपडे घालून एकताचे मंदिरात येणे नेटकऱ्यांना आवडवे नाही. त्यामुळे आता एकताला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


एकताच्या या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, 'असे कपडे घालून आली पण ही जीम नाही, हे मंदिर आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला की, 'मंदिरात असं कोण येत, असे कपडे परिधान करत मंदिरात येताना लाज वाटली पाहिजे... शेम ऑन बॉलिवूड.' अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी एकताला ट्रोल केले आहे. (ekta kapoor brutally trolled for wearing shorts while visiting temple) 


एकताने तिच्या प्रॉडक्शन हाऊस बालाजी टेलिफिल्म्समध्ये 'एक व्हिलन रिटर्न्स', 'ड्रीम गर्ल', 'एक व्हिलन', 'द डर्टी पिक्चर' यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. याशिवाय ती 'कुंडली भाग्य', 'नागिन' आणि 'कसौटी जिंदगी की' या मालिकांसाठी ओळखली जाते.