Ekta Kapoor on Radhika Madan: हिंदी चित्रपट-मालिकांसाठी कॉन्ट्रोव्हर्सी (Bollywood Controversy) ही काही नवी नाही. त्यातून हल्ली हिंदी चित्रपटांप्रमाणे हिंदी मालिकांमध्येही वादांना फोडणी मिळल्याचे दिसते आहे. सध्या अशाच एका वादग्रस्त विषयावर चर्चा सुरू झाल्या दिवगंत अभिनेते इम्ररान खान (Imran Khan) सोबत अंग्रजी मीडियम या चित्रपटातून अभिनेत्री राधिका मदन (Radhika Madan) ही पहिल्यांदा प्रकाशझोतात आली होती. हा चित्रपट लॉकडाऊनमुळे चांगला चालू शकला नव्हता परंतु चित्रपटातील अभिनयासाठी राधिकाचे आणि अभिनेते इमरान खानचे खूप कौतुक करण्यात आले होते. सध्या राधिका नवनव्या चित्रपटांतून प्रेक्षकांसमोर येते आहे. परंतु नुकत्याच केलेल्या एका विधानावरून सध्या तिला वरिष्ठ कलाकरांकडून टीका सहन करावी लागते आहे. पण नक्की हा वाद आहे तरी काय? (ekta kapoor slams radhika madan on her comments on television industry)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राधिका मदनचा कुत्ते हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे यानिमित्तानं तिनं दिलेल्या एका मुलाखतीवरून वादांग उडला आहे. राधिकानं आपल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, टेलिव्हिजन क्षेत्रात काम करतानाची परिस्थिती फारसी खास नाही यावर राधिका मदन हिनं भाष्य केलं आहे. ती म्हणते, मी ज्या सिरियलमधून (Television Serial Work Condition) माझ्या कामाची सुरूवात केली तिथे कामाची परिस्थिती फारशी चांगली नाही कारण मी स्वत: एका सिरियलसाठी 48-50 तास काम करायचे. कधीकधी तर दिग्दर्शकही अनेकदा आपल्या स्क्रिप्ट बदलायचे. आज एक कथा तर दुसरीच अशी परिस्थिती असायची. परंतु दिग्दर्शकही आम्हाला ''आप सेट पे जाओ...स्क्रिप्ट रेडी हैं''. असं म्हणायचे. आम्हाला तर कधी कधी आयत्यावेळीही स्क्रिप्ट मिळायचे असेही तिनं सांगितले. 


सध्या तिची ही मुलाखत सगळीकडेच व्हायरल होते आहे. परंतु तिच्या या वक्तव्यावर मात्र काही अभिनेत्रींनी आक्षेप घेतला आहे. त्यातून एक अभिनेत्री असं म्हणाली की, राधिका तू तुझ्या पहिल्या शोमध्ये तू खरंच खूप चांगले काम केले होतेच आणि मला आठवतेय ती एक टेलिव्हिजन मालिकेतून काम केले होतेस. परंतु ज्या व्यक्तीनं या क्षेत्रात काम केलंय त्याच व्यक्तीनं टेलिव्हिजनवर अशाप्रकारे वक्तव्य करणं यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता तिथे खाचखळगे येतातच आणि जगात स्ट्रगल केल्याशिवाय काहीच शक्य होत नाही. संकटांशिवाय यश मिळत नाही, अशी कमेंट करत राधिकाला सायंतानी घोष (Sayantani Gosh) हिला चांगलंच सुनावलं आहे. 


एकता कपूरनं मारली उडी! 



हेही वाचा - Rakhi Sawant Marriage: वयाने 17 वर्षे मोठ्या राखीसोबतच आदिलने का केलं लग्न? कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का..


टेलिव्हिजन निर्माती एकता कपूरनंही (Ekta Kapoor) या वादात आता उडी घेतली आहे. आपल्या सोशल मीडियावर तिनं सायंतानी घोषशी पोस्ट परत शेअर करत म्हटलं आहे की, अशा वाईट आणि लज्जास्पद कलाकारांना लाज वाटली पाहिजे. सायंतानी घोष तुझा खूप अभिमान वाटतो अशा भाषेत तिनं सायंतानीला पांठिबा दिला आहे.