मुंबई : आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन टी रामा राव यांच्या जीवनावर आधारित बायोपिक 'लक्ष्मी एनटीआर' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु निवडणूक आयोगाने मंगळवारी चित्रपट निर्माते रामगोपाल वर्मा यांना चित्रपट प्रदर्शित न करण्याचे आदेश दिले आहेत. हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित केला जाणार होता. निवडणूक आयोगाने १० एप्रिलला चित्रपट प्रदर्शित न करण्याबाबत सांगितलं होतं. त्यानंतर आता पुन्हा आयोगाने पुढील आदेशांपर्यंत चित्रपटाचं प्रदर्शन न करण्याबाबत सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत गेल्या काही दिवसांपूर्वी रामगोपाल वर्माने राज्या निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं. त्यावर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी गोपाल कृष्ण द्विवेदी यांनी आचारसंहिता चालू आहे तोपर्यंत चित्रपट प्रदर्शित न होण्याचं सांगितलं आहे. द्विवेदी यांनी १० एप्रिलला देण्यात आलेल्या बायोपिकशी संबंधित निवडणूक आयोगाच्या आदेशाचे पालन करण्याचे सांगितलं आहे. 



निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाचं प्रदर्शनही थांबवण्यात आलं आहे. निवडणूत आयोगाने यासांरख्या चित्रपटांमुळे लोकसभा निवडणूक २०१९ वर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे निवडणुकांनंतर चित्रपटाला प्रदर्शित करण्याचे सांगण्यात आले आहे.