मुंबई : जगातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटूंच्या यादीत ऑस्ट्रेलियाची एलिस पैरी (Ellyse Perry)चा नाव आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. फक्त ऑस्ट्रेलिया नाही तर भारतात देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. एलिस पैरी तिच्या क्रिकेट रेकॉर्डपेक्षा जास्त सौंदर्यामुळे चर्चेत असते. रंगणाऱ्या चर्चांना कारण देखील तसं आहे. एलिस क्रिकेटर नाही एक ग्लॅमरस मॉडेल दिसते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


तिचे फोटो सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर देखील तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. 


एवढंच नाही तर, एलिस ऑस्ट्रेलियासाठी सर्व फॉरमॅटमध्ये एकत्रितपणे सर्वाधिक सामने खेळणारी महिला क्रिकेटपटू आहे. 



तिने आतापर्यंत 253 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. एलिस पेरीने 20 डिसेंबर 2015 रोजी खेळाडू मॅट टोमुआसोबत लग्न केलं. 



पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.  2020 साली त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.  



एलिसला नुकताचं ऑस्ट्रेलियाच्या T20 संघातून वगळण्यात आलं, त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची निराशा झाली आहे.