मुंबई : आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड्स २०१९ च्या विजेत्यांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षीही ७१व्या एमी पुरस्कार सोहळ्यामध्ये 'गेम ऑफ थ्रोन्स' या सीरिजचं वर्चस्व पाहायला मिळालं. एकूण ३२ विभागांमध्ये नामाकनं मिळालेल्या या सीरिजला एकूण १२ पुरस्कार मिळाले आहेत. २०१८ प्रमाणेच यंदाच्या वर्षीसुद्धा या सीरिजला बेस्ट ड्रामा सीरिज या विभागातील पुरस्कार मिळाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक पर्व प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या सीरिजच्या वाट्याला आलेला हा पुरस्कार मात्र काही चाहत्यांना रुचलेला नाही. 'गेम ऑफ थ्रोन्स'च्या शेवटच्या पर्वाविषयी नाराजीचा सूर आळवत त्याच्या वाट्याला आलेलं हे यश मात्र न पटल्याची प्रतिक्रिया काहींनी दिली. 



बिल हॅडर ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता (विनोदी सीरिज) 


अभिनेता बिल हॅडर याला, Outstanding Lead Actor in a Comedy Series हा पुरस्कार मिळाला. ज्यानंतर पुरस्कार स्वीकारतेवेळी त्याने एलेक बर्गचे आभार मानले. 


ही आहे विजेत्यांची यादी... 


बेस्ट ड्रामा सीरीज: गेम्स ऑफ थ्रोन्स (Game of Thrones)


बेस्ट कॉमेडी सीरीज: फ्लीबॅग (Fleabag)


बेस्ट एक्टर (ड्रामा): बिली पोर्टर, पोज (Pose)


बेस्ट एक्टर (कामेडी): बिल हॅडर, बॅरी (Barry)


बेस्ट सपोर्टिंग एक्टर (कामेडी): टोनी शालहोब, द मार्वलस मिसेस मैसेल (The Marvelous Mrs. Maisel)


बेस्ट सपोर्टिंग एक्टर (ड्रामा): पीटर डिंकलेज, गेम्स ऑफ थ्रोन्स (Game of Thrones)


बेस्ट सपोर्टिंग एक्ट्रेस (ड्रामा): जूलिया गार्नर, ओझार्क (Ozark)


बेस्ट सपोर्टिंग एक्ट्रेस (लिमिटेड सीरीज और मूवी): पेट्रीसिया अर्क्वेट, द एक्ट (The Act)


बेस्ट वेरायटी टॉक शो: लास्ट वीक टुनाइट विद जॉन ओलिवर


बेस्ट टेलीव्हिजन मूवी: बंडर्सनैच (Bandersnatch), ब्लॅक मिरर (Black Mirror)