डब्बू अंकलच्या व्हायरल व्हिडिओमागची भावूक कहाणी...
त्यांच्या या डान्स व्हिडिओला एक भावनात्मक किनारही आहे
मुंबई : सोशल मीडियावर व्हायरल झालेले डब्बू अंकल आणि त्यांचा 'गोविंदा' स्टाईल डान्स तुम्हीही पाहिला असेल... सोशल मीडियाच्या माध्यमातून अगदी थोड्या कालावधीत घराघरात आणि प्रत्येक मोबाईलवर पोहचलेले डब्बू अंकल नाचताना, हसताना, रोमान्टिक अंदाजात तुम्ही पाहिले असतील... पण, त्यांच्या या डान्स व्हिडिओला एक भावनात्मक किनारही आहे.
एका टीव्ही कार्यक्रमात डब्बू अंकलनं या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या डान्समागे असलेली भावनात्मक किनार उघड केली. या डान्समुळेच खूप मोठ्या कालावधीनंतर डब्बू अंकल यांना आपल्या आईला हसताना पाहता आलं.
डब्बू अंकलचं खरं नाव संजीव श्रीवास्तव... गेल्या वर्षी एका रेल्वे अपघातात त्यांच्या छोट्या भावाचा मृत्यू झाला होता. या घटनेनं त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाच हादरवून टाकलं... आई तर जगण्याची उमेदच हरवून बसली... तिला आपल्या मुलाच्या अकाली निधनाचा जोरदार मानसिक धक्का बसला होता. या घटनेनंतर त्यांच्या आईनं घराबाहेर पाऊल ठेवलं नाही की कधी त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमललं नाही. नातेवाईक, शेजारी यांच्यासोबत उठणं-बसणंही बंद झालं होतं.
परंतु, संजीव यांची आई घरात एवढा आवाज का होतोय हे पाहण्यासाठी खाली उतरली... संजीव यांचा व्हिडिओ पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमललं... आणि आपल्या आईला हसताना पाहून संजीव यांना डान्ससाठी प्रोत्साहन मिळालं.
मी आईला हसताना पाहण्यासाठी आतूर झालो होतो... या व्हिडिओमुळे मी तिला पुन्हा एकदा हसताना पाहू शकलो. मला या व्हिडिओसाठी कुणाकडूनही पैशांची किंवा इतर कशाचीही अपेक्षा नाही... लोकांनी या व्हिडिओचा आनंद घेतला त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे... असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.