Kissing सीन करताना अभिनेत्याची वाईट अवस्था, सगळेच थक्क
नेहमी असा प्रश्न का विचारायचा याचं मला आश्चर्य वाटायचं.
मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सेटवर अभिनेत्रीला किस करताना खूप घाबरला होता. त्याची अवस्था अशी झाली होती की, तो एकच प्रश्न अभिनेत्रीला वारंवार विचारायचा. आता तुम्ही विचार करत असाल की सीरियल किसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मला कशाची भीती वाटतेय.
ही बातमी आहे, अभिनेता इमरान हाश्मीच्या किसिंग सीन संबंधित आहे, जेव्हा सगळेच चकीत झाले होते.
इमरानने विद्या बालनसोबत 'घनचक्कर'मध्ये काम केले होते. 'घनचक्कर' चित्रपटात इमरान हाश्मी आणि विद्या बालनने अनेक किसिंग सीन केले आहेत. रिपोर्टनुसार, विद्या बालनला किस केल्यानंतर इमरान हाश्मी खूप घाबरला होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विद्यासोबत किसिंग सीन दिल्यानंतर इम्रान अडचणीत यायचा. तिच्या अडचणीचे कारण होते विद्याचा पती आणि चित्रपट निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर.
किसिंग सीननंतर इमरान विद्याला सांगायचा सिद्धार्थ काय बोलणार? तो मला माझा पेमेंट चेक देईल असे तुला वाटते? कारण 'घनचक्कर' चित्रपटाचा निर्माता विद्या बालनचा पती सिद्धार्थ रॉय कपूर होता.
याचा खुलासा अभिनेत्री विद्या बालनने नेहा धुपियाच्या चॅट शो 'नो फिल्टर'मध्ये केला होता. शोमध्ये अभिनेत्रीने सांगितले होते की, इम्रान प्रत्येक किसिंग सीनची काळजी करत असे. तो मला नेहमी असा प्रश्न का विचारायचा याचं मला आश्चर्य वाटायचं.