Taarak Mehta ka Ooltah Chashmah Latest News: छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे 'तारख मेहता का उलटा चष्मा'. गेली पंधरा वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. पण गेल्या कही दिवसात या मालिकेवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात होती. याला कारण ठरलं होतं दयाबेन. दयाबेन (Dayaben) म्हणजेच दिशा वकानी ही तारक मेहतामध्ये पुन्हा दिसणार असल्याच्या बातमीने गेल्या काही दिवसात जोर धरला होता. TMKOC च्या ताज्या भागात गोकुळधाम आणि जेठालाल दयाबेनचं स्वागत करताना दिसले होते. पण प्रेक्षकांचा पुन्हा एकदा भ्रमनिरास झाला. पण पुन्हा एकदा दयाबेनचा प्रवेश न झाल्याने प्रेक्षक नाराज झाले आणि मालिकेवर बहिष्कार (#BoycottTMKOC) टाकण्याची मागणी केली जाऊ लागली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोशन भाभीचा प्रवेश
खरंतर तारक मेहता का उल्टा चष्मा या कार्यक्रमातून गेल्या काही काळात अनेक कलाकारांनी एक्झिट घेतली आहे. याच वर्षी जेनिफर बन्सीवाल (Jennifer Bansiwal) या अभिनेत्रीने तारक मेहतामधून बाहेर पडत निर्माते-दिग्दर्शक असीत मोदी (Asit Modi) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तेव्हापासून या कार्यक्रमात रोशन भाभी दिसलेली नाही. पण आता जेनिफरच्या जागी नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. रोशन भाभीचं पात्र अभिनेत्री मोनाज मेवावाला (monaz mevawala) साकारणार आहे. येणाऱ्या काही भागात मोनाज मेवावाला रोशन भाभीच्या रुपात टीव्हीवर दिसणार आहे. 


टीव्हीवरच्या लोकप्रिय कार्यक्रमात काम करायला मिळत असल्याने मोनाज चांगलीच खुश आहे. आपल्यावरच्या अपेक्षा पूर्ण करु असा विश्वास व्यक्त करत मोनाजने प्रेक्षकही आपल्यावर तितकच प्रेम करतील असं म्हटलं आहे. असित मोदी यांच्याबरोबर मोनाजने याआधीही काम केलं आहे. तारक मेहता कार्यक्रमात मोनाजच्या ग्रँड एन्ट्रीची तयारी करण्यात येत आहे. 


टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री
मुंबईत राहाणारी मोनाजने बराच काळ अभिनय क्षेत्रात घालवला आहे. लोकप्रिय अभिनेते फिरदोस मेवावाला यांची मोनाज ही मुलगी आहे. छोट्या पडद्यावर मोनाजने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. यात 'मीत मिला दे रब्बा', 'रिश्तों की डोर', 'झिलमिल सितारों का आंगन होगा', 'जय दुर्गा, अर्धांगिनी' या मालिकांचा समावेश आहे. या मालिकांमधून तीने बरीच लोकप्रियता मिळवली आहे. 



जेनीपर बंसीवालची एक्झिट
तारक मेहता मालिकेच्या सुरुवातीपासून जेनीफर बंसीवाल हीने रोशन भाभीची भूमिका साकारली होती. पण याच वर्षातल्या मार्च महिन्यात तीने मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. जेनिफरने असीत मोदींवर गंभीर आरोपही केले. मालिकेतेली कलाकारांबरोबर असीत मोदी यांचा व्यवहार वाईट असल्याचा आरोप जेनिफरने केला होता.