मुंबई : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खानची (Salman Khan) एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री सोमी अली (Somi Ali) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 90 च्या दशकात सलमान आणि सोमीच्या अफेअरची चर्चा सर्वत्र होती पण नंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला. त्यानंतर आता सोमी अलीने लवकरच सलमान खानचा पर्दाफाश करण्याचा इशारा दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमीने सलमानची तुलना हार्वे वाइनस्टीनशी केली. हार्वे वाइनस्टीन हा हॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता असून, त्याच्यावर 100 हून अधिक महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.


सोमी अलीची पोस्ट
सोमीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली असून त्यात तिने म्हटलंय 'बॉलिवूडचा हार्वे वाइनस्टीन, एक दिवस तुझाही पर्दाफाश होईल. ज्या महिलांबरोबर तू गैरवर्तन केलं आहेस, त्या सर्व एक दिवस समोर येतील आणि सत्य सांगतील. जसं ऐश्वर्या राय बच्चन...' ही पोस्ट शेअर करत सोमीने सलमान खान आणि भाग्यश्रीच्या 'मैंने प्यार किया' चित्रपटातील एक फोट शेअर केला आहे.



याआधीही सलमानवर आरोप
सोमी अलीने याआधीही सलमान खानवर निशाणा साधला होता. एका मुलाखतीत सोमीने सलमानने आपली फसवणूक केल्याचं म्हटलं होतं. ऐश्वर्या रायमुळे सलमान-सोमीचे नाते तुटल्याचं बोललं जातं. 


सलमान आणि ऐश्वर्याचे ब्रेकअप का झालं?
1999 मध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि सलमान खान यांची संजय लीला भन्साळी यांच्या 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान भेट झाली होती. यादरम्यान त्यांच्यात प्रेम फुलले. पण कालांतराने दोघांच्या नात्यात इतकी कटुता आली की आज दोघं एकमेकांचं नावही घेत नाहीत.