Kareena Kapoor Troll: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरला सध्या सोशल मीडियावर (Social Media) ट्रोलचा (Trolled) सामना करावा लागत आहे. सोशल मीडियावर युजर्सने तिला खडेबोल सुनावले आहेत. याला कारणही तसंच घडलंय. करीना कपूर (Kareena Kapoor) एका कार्यक्रमात उपस्थित राहिली होती. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणी असलेल्या करीना कपूरच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करण्यात आलं. त्यानंतर राष्ट्रगीत (Natinal Anthem) सुरु झालं. पण यावेळी करीना कपूरकडून एक चूक झाली आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सोशल मीडियावर युजर्सने करीनाला चांगलंच ट्रोल केलं आहे. हा व्हिडिओ इन्स्टंट बॉलिवूडने (Instant Bollywood) पोस्ट केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करीना कपूरचं नेमकं काय चुकलं?
या कार्यक्रमात करीना कपूरने (Kareena Kapoor) लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. दीपप्रज्ज्वलन झाल्यानंतर करीना कपूरने सर्वांसोबत राष्ट्रगीत गायलं. पण यावेळी तिच्याकडून एक चूक झाली. राष्ट्रगीतावेळी सावधान स्थितीत उभं राहण्याची पद्धत आहे. पण करीना राष्ट्रगीतावेळी आपले दोन्ही हात पकडून उभी असल्याचं या व्हिडिओत दिसंतय. तसंच राष्ट्रगीतावेळी तिच्या चेहऱ्यावरचे हावभावही लोकांचं लक्ष वेधून घेत होते. 


करीना कपूरचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर युजर्सने तिला चांगलंच सुनावलं आहे. एका युजरने म्हटलंय, कोणीततही हिला सांगा राष्ट्रगीत सुरु असताना सावधान राहातात. ही हात धरून उभी आहे. एका युजरने म्हटलंय ही इथेही अभिनय करतेय का?


करीनाचं ओटीटी पदार्पण
करीना कपूर लवकरच ओटीटी पदार्पण करणार आहे. 'जाने जान' या चित्रपटात करीना प्रमुख भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपटात करीना कपूरबरोबर विजय वर्मा आणि जयदीप अहलावत प्रमुख भूमिकेत आहेत. जाने जान हा चित्रपट मर्डर मिस्ट्रीवर आधारित आहे. दिग्दर्शक शुजॉय घोष यांची हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 


दरम्यान, बॉलिवूडमध्या सुपरहिट ठरलेल्या कहो ना प्यार है (Kaho Naa Pyaar Hai) या चित्रपटात अमीषा पटेलच्या (Ameesha Patel) जागी करीना कपूर पहिली पसंती होती असं एका मुलाखतीत समोर आलं आहे. काही दिवसांच्या शुटिंगनंतर करीनाने हा चित्रपटा सोडल्याचं बोललं जात होतं. पण अमीषा पटेलने एका मुलाखतीत सांगितलं, करीना कपूरने तो चित्रपट सोडला नाही तर तिला राकेश रोशन यांनी बाहेरचा रस्ता दाखवला होता.